Ram Navami 2023 esakal
संस्कृती

Ram Navami 2023 : सोशल कनेक्ट ते परिस्थितीला स्पोर्टिंगली सामोरे जाण्याचे Life Hacks देतात श्रीराम

सध्याच्या युगात आपण प्रभू श्रीरामाकडून काय शिकू शकतो, हे जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

जान्हवी ओक

Ram Navami 2023 7 Life Lessons Prabhu Shriram :

प्रसंग – रेल्वेचं रिझर्व्हेशन न मिळाल्यामुळे वैतागलेली नेहा, कशातच राम नाही, असे स्वतःशीच पुटपुटत होती. आईच्या हाकेकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. शेवटी आईने तिच्या पाठीवर थाप मारत तिला विचारले, का ग, कशात राम नाही ?

तेव्हा ती म्हणाली, अर्धा मिनिट अगोदर रिझर्व्हेशन केले असते तर...

आई म्हणाली, अग चुक तुझी आहे, तु आयत्या वेळेस रिझर्व्हेशन करायला गेली तर मग काय होणार ?

ना नियोजन, ना दूरदृष्टी. रामाला कशाला दोष देतेस. तो तर चराचरात आहे. राम नाही, असे म्हणून निराश होऊन कसे चालेल.... वेळेच्या नियोजनापासून ते जीवन सुरळीत चालण्यासाठी कसं नियोजन असावं इथपर्यंत सारंच शिकण्यासारखं आहे.

सध्याच्या युगात आपण प्रभू श्रीरामाकडून काय शिकू शकतो, हे जाणून घेऊया...

1. रिअल लाईफ सोशल कनेक्ट जपणारा राम

राम तर आर्य संस्कृतीचा आदर्श पुरुष. श्री विष्णूचा सद्गुणी, सात्त्विक अवतार. पराक्रमी, धर्मज्ञ, सर्व भूतांचे म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करणारा दयाळू, न्यायी राजा. निंदा, व्देष, मत्सर, छलकपट, करण्याची त्याची वृत्ती नाही. उलट लोकांमध्ये मिसळू त्यांचे दुःख जाणून ती दूर करण्यासाठी प्रभू रामचंद्र सतत कार्यरत राहतात. आबालवृद्धांचा ते सतत आदर करतात.

वनवासात त्यांनी पशुपक्षी झाडे, वेली सर्वांशी मैत्री केली. अभ्यास केला. ज्या वनसंपदेचा आज तुम्ही आधुनिक उपकरणांचा आधार घेत अभ्यास करता. वनवासात त्यांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार केला नाही, उलट जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत या उक्तीनुसार त्यांनी माणसाला माणूस जोडला. तसेच वानरसेनाही तयार केली.

2. रामाकडून शिका सेल्फ डेव्हलपमेंट स्कील्स

महर्षी वाल्मिकी ऋषींच्या रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत. ज्यांना नेतृत्व करायचे, त्यांच्यासाठी हे आदर्श व्यक्तिमत्त्व. सेल्फ डेव्हलपमेंट स्किल्सही त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहेत. जसे एखादी व्यक्ती आपल्याला जर काही बोलली तर नाण्याला दुसरी बाजू असते, त्याचाही विचार करावा. मनात राग, लोभ, भय याला थारा देऊ नये.

3. संकटांना न घाबरता सामोरे जाणारा राम

प्रभू रामचंद्रही मातापित्याशी न भांडता, जानकीसह वनवासाला गेले. राजा असो व रंक, परिस्थिती बदलतच असते, अशा वेळी आपला धर्म, निती सोडता कामा नये. आपले कर्तव्य जसे सुस्थितीत तसेच दुस्थितीत बजावण्यास मागे-पुढे पाहू नये, हाच धर्म. दुःखाने घाबरून कुमार्गाकडे वळू नये, मनाला सन्मार्ग आणि सदाचाराची सवय लावावी.

परद्रव्याचा लोभ करू नये. स्वकष्टार्जीत रूपयासुद्धा मनाला समाधान आणि रात्रीची शांत झोप मिळवून देतो. श्रीरामांचे युवराज्यपद गेले, तरी त्यांच्या मनाची स्थिती ढळली नाही की मनात कुविचारांचे, कपटाचे पीकही आले नाही. शेतकरी शेताची मशागत करतो, त्यामुळे आपल्याला उत्तम धान्य, फळे मिळतात. तसेच सेल्फ डेव्हलपमेंट स्किल्सचा योग्य ठिकाणी योग्य वापर करण्याची मात्र जरूर आहे.

4. ‘टीम वर्क’वर फोकस करणारा राम

दुसऱ्यामध्ये असलेल्या उत्तम गुणांचा शोध घेऊन त्याला योग्य ते काम देणे अथवा करून घेणे. यातून विन-विन सिच्युएशन निर्माण होते. यामध्ये दोघांचेही काम होते. श्रीराम हे मितभाषी, नम्र, सुशील, सत्यवादी, शांत, असूयारहित, कृतज्ञ होते. आपण कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करावी, संवाद साधावा. थोड्याशा कारणावरुन टोकाचे निर्णय घेतले जाऊ नयेत, म्हणून संवाद वाढवावा.

आपली बाजू मांडताना ती आक्रमकरित्या न मांडता, सौजन्याने, त्यांचा मान राखत मांडावी हे प्रभू रामचंद्र आपल्या कृतीतून सांगतले आहे. हीच गोष्ट टिम वर्कमध्ये अपेक्षित असते. आपली बाजू योग्य प्रकारे मांडली तर आपल्या टिममधील सर्वांचेच कल्याण होऊ शकते आणि आपले कार्य सिद्धीस जाऊ शकते.

5. स्पोर्टिंगली घेणारे प्रभू श्रीराम

समर्थ रामदासांनी त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून राष्ट्र उभारणीचे काम समर्थपणे केले. सध्याच्या पिढीला राम = वनवास आणि वनवास = कैकयी. पण कैकयीमुळे रामरायांना जरी वनवास भोगावा लागला, तरी ते तिला जराही दोष देत नाहीत की अपशब्द काढत नाही. उलट तुमच्या भाषेत त्यांनी ते स्पोर्टिंगली घेतले.

6. स्थितप्रज्ञतेचा गुण

अगं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतु फक्त निसर्गातच नसतात, तर मनुष्याच्या आयुष्यातही असतात, पण सुखाने आनंद होणे बरोबर आहे. पण त्याच्या झुल्यावर झुलत राहणे चुकीचे आहे. कारण सतत तुम्हांला यशाची सवय झाली, की थोड्याशा अपयशानेही तुम्ही हिरमुसता, निराश होता. राज्याभिषेकाच्या वेळी रामरायांना वनवासात जावे लागले. पण त्यांची मनाची स्थिती जराही ढळली नाही. हा स्थितप्रज्ञतेचा गुण आपणा सर्वांमध्ये यावा असाच आहे. श्रीराम आणि हनुमान ही जीवन विकासाची प्रतिके. कलीयुगात शिस्त आणि संघटन या शिवाय पाड लागणे कठीण.

7. शत्रूशी लढण्याची ताकद असलेला राजा

सुष्टांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी हा राम जन्म. तो फक्त रामनवमीला सेलिब्रेट न करता रोज प्रत्येकाच्या मनात व्हायला हवा. आता असं पहा, रावण हा विद्वान पंडित होता. सद्गुणांबरोबर दुर्गुणही प्रत्येकातच असतात. तसं त्याच्यामध्ये मोह होता. आता दुष्टांचे निर्दालन म्हणजे आपल्या मनातील दुष्पवृत्तींना अग्नि देणे. हेच खरं तर सेल्फ डेव्हलपमेंट स्किल आहे. श्रीरामरायांचे शत्रू कमी का होते, पण तरीदेखील ते असूयारहित होते, त्यांच्यामध्ये द्वेष, मत्सराला स्थान नव्हते. या मुळे मीपणा जावून आम्ही येईल. आम्ही म्हणजे एकीचे बळ. हा आम्ही शत्रूशी लढण्याची, दोन हात करण्याची ताकद वाढवते.

आयुष्यात येणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रसंगांना न घाबरता, त्यावरचे सोल्यूशन शोधण्याचा प्रयत्न करावा. मन खंबीर बनवावे. मन खंबीर असेल तर आत्मविश्वास वाढतो आणि एखादी दिव्यांग व्यक्तीसुद्धा पर्वत चढू शकते, हे आपल्याला माहिती आहे. रामासारखे आपले मन खंबीर बनवावे, प्रयत्न आणि कष्टामध्ये कसूर करू नये. कारण प्रयत्नात परमेश्वर असतो, तर जेथे राबती हात तेथे हरि असे गदिमा सांगून गेले. फळासाठी कर्म अनिवार्य आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

वैज्ञानिक प्रगतीमुळे जग जवळ आले, पण माणूसपण हरवले. विज्ञानाना विधायक प्रगती जशी झाली, तशी विघातक अधोगतीही झालेली दिसून येते. विधायकतेच्या वाटेवर मार्गक्रमण करताना विवेक जागृत ठेवायला हवा असे वाटते. संगच्छध्वं संवध्वम् हाच तर मूलमंत्र आहे, जगण्याचा.

oakjanhavi2409@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT