Significance of Ayodhya Ram Mandir Sakal
संस्कृती

Ayodhya Ram Mandir : पण राम आत्ताच का? हरवलेल्या संस्कृतीच्या पुनर्उभारणीसाठी...

देशात सध्या अयोध्येतील राममंदिराबद्दल खूपच उत्सुकता आहे. कारण ही एक ५०० वर्षापासूनची आकांक्षा आहे. हे मंदिर महत्त्वाचे आहे, कारण अनेक प्रकारे, निदान देशाच्या उत्तर भागातील लोकांसाठी, राम हा त्यांचा आत्मा आहे. त्यामुळे हे फक्त आणखी एक मंदिर नाही. राम आणि रामायण भारतीय परंपरेचे इतके महत्त्वाचे भाग आहेत

सकाळ वृत्तसेवा

Historical and Significance of Ayodhya Ram Mandir : इतिहासात तेच लोक स्मरणात राहतात, ज्यांनी योजनाबद्धप्रकारे मोठे अनर्थ होण्यापासून टाळले किंवा ज्यांनी इतर लोकांना त्यांच्या वैयक्तिक सीमांपलीकडे जाण्यासाठी प्रेरित केले.

सुमारे ७००० वर्षांनंतरही, रामाचे स्मरण केले जाते आहे, कारण त्यांनी हजारो पिढ्यांपासून लोकांना चांगुलपणा जोपासण्यासाठी, सत्याला धरून राहण्यासाठी आणि एकमेकांसोबत प्रेमाने राहण्यासाठी प्रेरित केले.

तर, एखादी व्यक्ती इतरांसाठी कधी प्रेरणा बनते? जर तुम्ही रामाची जीवनकथा पाहिली; प्रत्येकाला रामायण माहीत आहे, किमान मुख्य घटना तरी, जर तुम्ही मुख्य घटनांवर नजर टाकली, तर रामाचे जीवन आपत्तींची एक श्रृंखलाच होती.

राज्य गमावण्यापासून पत्नीला हरवण्यापर्यंत, पत्नीला पुन्हा जंगलात पाठवणे, आपल्या मुलांना न बघणे, मग ते कोण आहेत हे न जाणता रणांगणात त्यांच्यासोबत युद्ध करणे – केवढे भयंकर आयुष्य! मग रामाबद्दल एवढ्या उत्कट भावना कशामुळे?

कारण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या आपत्तींच्या अखंड मालिकेतून जाताना देखील तो अविचल राहिला. त्याने कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आत राग, संताप किंवा द्वेष येऊ दिला नाही आणि आवश्यक तेच केले.

श्रीलंकेतील आपली लढाई संपवून त्याला युद्धाच्या पापासाठी आणि त्यात झालेल्या जीवितहानीसाठी प्रायश्चित्त करायचे होते. जरी त्याला युद्ध योग्य वाटले होते, तरीही रक्त सांडल्याबद्दल त्याला पश्चात्ताप होता, विशेषत: रावणाचं, कारण तो शिवाचा महान भक्त होता.

ही एक अशी संस्कृती आहे जिने मुक्तीला सर्वोच्च महत्त्व दिले आहे. याचा अर्थ जिवंत असतानाच सर्व गोष्टींपासून मुक्त होणे. तुम्ही रोजच्या जीवनातून माघार घेतली आहे असे नाही; तुम्ही सक्रिय आहात पण मुक्त आहात. तुम्ही संरक्षित कोषामध्ये नाही.

राम जगात कृतिशील होता, लढाईदेखील लढला, पण शत्रूविरुद्ध संताप, राग आणि द्वेष न बाळगताच हेच त्याने दाखवून दिले. त्याच्या याच गुणापुढे आपण नतमस्तक आहोत. म्हणूनच आपण त्याला; ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणतो. आपण त्याला देव म्हणत नाही.

पुरुषोत्तमचा शब्दशः अर्थ, एक अतिशय श्रेष्ठ मनुष्य. ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणजे जो सर्वांच्या आदरास पात्र आहे. तुम्हाला तो आवडो किंवा न आवडो, परंतु त्याचे गुण असे आहेत की, तुम्हाला त्याचा आदर करावाच लागेल. तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनात असे होऊ शकलात, तर तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल.

ही एक अशी संस्कृती आहे जिथे कोणीही स्वर्गातून उतरले नाही. ही एक अशी संस्कृती आहे जिथे मानव दैवी बनू शकतो. आपण आपल्या आतच दैवी गुणांचे पोषण करतो. योग आणि आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये हीच शक्यता आहे.

आणि हे केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. तर, राम मंदिर म्हणजे मुळात आपल्या संस्कृतीचा हरवलेला एक पैलू पुन्हा मिळवण्याबद्दल आहे. ही संस्कृती ‘कुठेतरी एक देव आहे जो आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल’ किंवा ‘तो आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल,’ या ढोबळ विश्‍वास प्रणालींपासून मनुष्यांनी स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतः प्रयत्न करण्याबद्दल आहे.

हे आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करण्याबद्दल आहेस जेणेकरून आपण येथे जिवंत असताना देखील आपण त्यांच्या पलीकडे असू शकू. तुम्ही तुमच्या जीवनात हे केल्यास तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. या गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राम मंदिर आणि तत्सम रचना महत्त्वाच्या आहेत, कारण लोकांना या गुणांसाठी प्रयत्न करायला अशा प्रतीकात्मक गोष्टी आवश्यक आहेत.

देशात सध्या अयोध्येतील राममंदिराबद्दल खूपच उत्सुकता आहे. कारण ही एक ५०० वर्षापासूनची आकांक्षा आहे. हे मंदिर महत्त्वाचे आहे, कारण अनेक प्रकारे, निदान देशाच्या उत्तर भागातील लोकांसाठी, राम हा त्यांचा आत्मा आहे.

त्यामुळे हे फक्त आणखी एक मंदिर नाही. राम आणि रामायण भारतीय परंपरेचे इतके महत्त्वाचे भाग आहेत, की ते मोडकळीस आलेल्या राष्ट्रीय भावनेला पुन्हा उभारी देऊ शकतात. पण राम आत्ताच का?

सद्‌गुरु ईशा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT