Ramadan 2023 Fasting Tips Esakal
संस्कृती

Ramadan 2023 Fasting Tips: रमजान महिन्यात रोजे ठेवताना अशी घ्या आरोग्याची काळजी

रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. हा महिना मुस्लीम बांधवांसाठी खास असतो. या महिन्यात ते मोठ्या श्रद्धेने निरंकार रोजे ठेवतात. या दिवसात सर्व दिवस रोजा करणारे रोजदार दिवसभर अन्न आणि पाणीसुद्धा ग्रहण करत नाहीत

Kirti Wadkar

Ramadan 2023 Fasting Tips: रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. हा महिना मुस्लीम बांधवांसाठी खास असतो. या महिन्यात ते मोठ्या श्रद्धेने निरंकार रोजे ठेवतात. या दिवसात सर्व दिवस रोजा करणारे रोजदार दिवसभर अन्न आणि पाणीसुद्धा ग्रहण करत नाहीत.

अत्यंत कठीण असे हे उपवास करत असताना त्यांना संयम आणि मानसिक संतुलन राखणं गरजेचं असतं. Ramadan Month Roja Observation precautions

रमजानच्या Ramadan ३० दिवसांच्या काळात सुर्योदयापूर्वीपासून ते सुर्यास्तापर्यंत अन्न पाणी वर्ज्य केलं जातं. त्यामुळे सेहरी म्हणजेच सुर्योदयापूर्वीचं भोजन आणि इफ्तारी म्हणजे सुर्यास्तानंतरचं भोजन अशा दोनवेळी अन्न पाणी प्राशन केलं जातं.

एकीकडे वाढती गरमी आणि त्यात अन्न पाण्याविना संपूर्ण दिवस काढणं असे कडक रोजे Roja करत असताना रोजदारांनी आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

१. शक्य तेवढं पाणी प्या- रमजानच्या महिन्यामध्ये शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीच सेहरीपूर्वी भरपूर प्रमाणात पाणी प्यावं तसचं इफ्तारीनंतरही पाणी तसचं मोसंबी आणि नारळपाण्याचं सेवन करावं. तसचं सेहरी आणि इफ्तारीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करा.

यासाठी कलिगंड, काकडी, खरबूज अशा फळांचं सेवन शरीरात पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करतात. तसचं कॅफेन आणि साखर असलेल्या पेयाचं सेवन करू नये. अशा पेयांमुळे आणखी तहान वाढू शकते. चहा, कॉफी आणि सोडा अशा पदार्थांपासून दूरच रहावं.

२. हेल्दी डाएट- रोजे सुरू असताना तळलेले पदार्थ किंवा मिठाई खाण्याएवजी फळं आणि मुबलक प्रमाणात प्रोटीन असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. तसचं भाज्या आणि धान्यांचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक असलेले कार्बोहाइड्रेड आणि प्रोटीन मिळण्यास मदत होईल.

३. असं असावं सेहरीचं भोजन- रोजे सुरू असताना अनेक जण इफ्तारीचं भोजन करता. मात्र सेहरीचं भोजन करत नाही, अनेकांना सकाळी काही खाणं आवडतं नाही. मात्र सेहरीचं भोजन चुकवू नये.

रमजानमध्ये सुर्योदयापूर्वी जे भोजन केलं जातं त्याला सेहरी म्हणतात. त्यानंतर पूर्ण दिवसभर म्हणजेच जवळपास १४ तास निरंकार उपवास असतो. यासाठी सेहरीचं भोजन असं असावं ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस एनर्जी मिळेल.

यावेळी एक बॅलेन्स डाएट घेणं गरजेचं आहे. यात भरपूर भाज्या तसचं ब्राऊन राईस किंवा ब्राऊन ब्रेड असे कॉम्प्लेक्स कार्ब असलेले पदार्थ किंवा फायबरयुक्त पदार्थ खावे.

जेणे करून अधिक वेळ पोट भरलेलं राहिल. यावेळी पांढरा भात किंवा ब्रेड खाऊ नये. कारण या भातात साखरेचं प्रमाण अधिक असल्याने तहान लागण्याची शक्यता वाढते. Health tips for ramadan

४. उपवास तोडताना या गोष्टीची काळजी घ्या- सहजा खजुर खावून उपवास सोडला जातो. यावेळी खजुर खाताना त्यासोबत चिमुटभर सूंठ पावडर खावी. किंवा खजुराच्या पेस्टमध्ये सुंठ पावडर मिसळून त्याची गोळी तयार करून या गोळीचं सेवनं करावं.

यामुळे पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत. तसचं उपवास सोडल्यानंतर दोन तासांनी एक हलका आहार घ्यावा. यात ब्राऊन राइस, लीन व्हाइट मीट किंवा चिकनचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. ramadan fasting tips

५. व्यायाम करा- व्यायाम करणं हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचं आहे. अगदी जिममध्ये जाऊन व्यायाम करणं गरजेचं आहे. घरच्या घरी देखील काही एक्सरसाइज करू शकता.

रोजे धरणाऱ्यांनीही वॉकिंग जॉगिंग करून सक्रिय राहण्याचा प्रयत्न करावा. उपवास तोडण्याआधी किंवा जेवणानंतर ३ तासांनी व्यायाम करू शकता. Diet Tips For Roza

६- आराम करा- जेवल्यानंतर गरम पाणी प्यावं किंवा जिरं आणि बडीसोपचं पाणी प्यावं यामुळे पचन होण्यास मदत होईल. याशिवाय चांगली आणि पूर्ण झोप महत्वाची आहे. यामुळे शरीराला आराम मिळेल.

हे देखिल वाचा-

७. मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं - रोजे धरणाऱ्या मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसचं नियमितपणे ग्लुकोजची पातळी तपासत रहावी. यावेळी टाइप-१ डायबीटीज रुग्णांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

सेहरी आणि इफ्तारवेळी दह्यात मीठ घालून किंवा ताक तसचं नारळ पाणी आणि फळांचं सेवन कराव. तसचं ड्रायफ्रूटस् मध्ये आक्रोड आणि बदाम फायदेशीर ठरू शकतात.

या छोट्या छोट्या गोष्टी ध्यानात घेऊन आरोग्याची काळजी घेत रोजे करा आणि तुमच्या कुटुंबाची देखील काळजी घेत रमजान साजरा करणं आनंददायी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT