Rebirth Signs esakal
संस्कृती

Rebirth Signs : हा तुमचा पुनर्जन्म आहे का? ओळखा या संकेतांवरून

Rebirth Signs In Marathi : बऱ्याचदा आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे हा तुमचा पुनर्जन्म आहे का ओळखता येते.

धनश्री भावसार-बगाडे

Reincarnation Signs In Marathi : बऱ्याचदा आपल्या बाबत अशा काही गोष्टी घडत असतात ज्याचा बऱ्याचदा आपल्याला उलगडा होत नाही. काही गोष्टींच आपल्याला प्रचंड आश्चर्य वाटत असतं. विश्वास बसतोच असं नाही. पण जर अशा काही गोष्टी घडत असतील तर ते पुनर्जन्माचे संकेत असू शकतात. स्टार्स इन्सायडरने याबाबतचं एक वृत्त दिलं आहे.

तुमचा पुनर्जन्म आहे की, नाही हे सांगणारे काही संकेत आपल्याला या जन्मात मिळत असतात. ज्या गोष्टींचा या जन्मात संबंध नाही, अशा घडतात, वारंवार काही गोष्टी आठवत असतील, स्वप्नात दिसत असतील तर अशा गोष्टी तुमच्या आत्म्याने अनेक वेळा पुनर्जन्म घेतला आहे, याचा संकेत देत असते. कोणकोणते संकेत मिळतात, जाणून घेऊया.

जन्म खूण

एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असणारी जन्मखून पुनर्जन्माचा संकेत गेते. या खूणेला कधी कधी पूर्वजन्मातल्या आघाताची शारीरिक खूण मानली जाते. हे कधी आघाताची असते. तर कधी तुळशीचे पान किंवा लासल म्हटले जाते असे डाग असतात.

Rebirth Signs

अनोळखी व्यक्तीबाबत आत्मीयता

कधी कधी काही अनोळखी व्यक्तीबाबत आत्मीयता वाटते, काही व्यक्तींशी काही संबंध नसताना राग येतो. त्या व्यक्तीशी आपले खूप दृढ संबंध आहेत असं वाटू लागतं. हे पूर्वजन्माचे संकेत असतात. कारण पूर्वजन्मात त्या व्यक्तीशी आत्म्याचे कनेक्शन असते, असे मानले जाते. याशिवाय कोणताही आजार नसताना सुरू झालेल्या वेदनाही पुनर्जन्माचा संकेत समजला जातो.

पृथ्वीबद्दल आपलेपणा न वाटणे

जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही पृथ्वीवरचे नाही, हे तुमचं घर नाही, तर हे सुद्धा पुनर्जन्माचे संकेत आहेत. कारण बऱ्याचदा पुनर्जन्म घेतलेले आत्मे पृथ्वीच्या जीवनाला कंटाळलेले असतात. त्यांना या जन्माचे चक्र पूर्ण करून मोक्ष प्राप्त करायचे असते.

Rebirth Signs

अचानक दुसरी भाषा बोलणे

जर कोणी कधीही न वाचलेली, ऐकलेली, न शिकलेली अशी अगदीच निराळी भाषा त्यांना सहज समजू लागली किंवा बोलू लागले तर हे पुनर्जन्माचे संकेत असते. एखादी व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागल्याचे प्रकार घडत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. हा प्रकार बऱ्याचदा हिप्नोटाइज किंवा कोमातून बाहेर आल्यावर घडल्याचे बघायला मिळते.

स्वप्न

स्वप्न हे अवचेतन मनाचं प्रतिबिंब असतात. काहींचा असा विश्वास आहे की, वारंवार पडणारी स्वप्न पूर्वजन्मातले अनुभव प्रतिबिंबीत करतात. काहींना अशा ठिकाणांची, व्यक्तींची स्वप्न पडतात, ज्यांना कधीच भेटलेले नसतात. पण त्यांना स्वप्नात येणारे ते ठिकाण, व्यक्ती खूप परिचित वाटत असतात.

Rebirth Signs

स्वतःच वय जास्त वाटणे

बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं वय जास्त वाटू लागतं किंवा एखादी व्यक्ती लहान असतानाही मोख्या व्यक्तीसारखे वागत असल्याचं जाणवतं. हेसुद्धा पुनर्जन्माचे संकेत देते. तुम्ही किती वेळा पुनर्जन्म घेतला हे तुमच्या उर्जेमध्ये परावर्तीत होत असते.

विविध आठवणी

लहान मुलांच्या बाबतीत सहसा असे प्रकार घडतात. अशी अनेक प्रकरणं घडले आहेत. ज्यात लहान मुलं अशा काही आठवणींना तपशीलवार सगळं आठवतं, ज्या त्यांनी कधी अनुभवलेलं नसतं. या आठवणी केवळ काल्पनिक वाटू शकतात. हे देखील पुनर्जन्माचे संकेत देतात.

आकर्षण, आत्मीयता वाटणे

एखाद्या नवीन ठिकाणाविषयी, संस्कृती किंवा वातावरणाविषयी प्रचंड आत्मीयता वाटणे, आपण त्यांच्यापैकी एक वाटणे, कधी कधी आपण हे अनुभवलं आहे असं वाटणं हे पूनर्जन्म असल्याचे सुचित करते.

अंतर्ज्ञान

अंतर्ज्ञान हे सुद्धा पूर्वजन्माकडे संकेत करते. एखाद्या न घडलेलेया गोष्टीबद्दल तुम्हाला समजणं किंवा अशी गोष्ट समजण्यास तुम्ही सक्षम असल्यास तुमच्याकडे तीव्र अंतर्ज्ञान असू शकतं. तुम्ही मागच्या जीवनातल्या विविध घटनांमदून खूप अनुभव घेतला असून त्याचा तुम्हाला वर्तमान जीवनात फायदा होतो, असं त्यातून निर्देशीत होतं.

पूर्वज्ञान

भविष्याविषयीची दृष्टी हेसुद्धा पुनर्जन्म झाल्याचं एक लक्षण मानलं जातं. यामध्ये दृष्टांत, शारीरिक संवेदना किंवा अगदी स्वप्नांद्वारे भविष्याबद्दल गोष्टी जाणून घेण्याची क्षमता समाविष्ट असते. काहींचा असा विश्वास आहे की यावरून तुमचा आत्मा परिपक्व झाला आहे आणि अनेक आयुष्य जगला आहे असे संकेत मिळतात.

डेजा वू

डेजा वू ही संवेदना जवळपास प्रत्येकजण अनुभवत असतो. या संवेदनेस वास, आवाज, दृष्टी, अभिरुची आणि इतर अनेक घटकांमुळे चालना मिळत असते. न्युरोलॉजिकल विसंगतीमुळे असं मानलं जातं की, यामध्ये भूतकाळातले अनुभव प्रकट होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT