Til On Nose: सामुद्रिक शास्त्रानुसार नाकावरील तीळ असणं फार शुभ मानल्या जातं. अशा लोकांचं व्यक्तिमत्वही आकर्षक असतं. या शास्त्रानुसार शरीराच्या विविध भागांवर असलेले तीळ तुमच्या आयुष्यातील अनेक गुपित उलगडू शकतात. नाकावर तीळ असणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं ते आपण जाणून घेऊया.
नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असणारे
सामुद्रिक शास्त्रानुसार नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असण शुभ मानलं जातं. अशा लोकांचं व्यक्तिमत्व आकर्षित असण्याबरोबरच त्यांची वाणीही मधुर असते. त्यांच्या बोलण्याने ते लोकांना प्रभावित करू शकतात.
ज्या महिलांच्या नाकावर उजव्या बाजूला तीळ असतात त्यांना फार भाग्यशाली समजल्या जातं. त्यांना वेळीच संतानसुख प्राप्त होतं. तसेच अशा लोकांना नोकरीतही उच्चपद प्राप्त होतं. जीवनात असे लोक फार सकारात्मक असतात. त्यांच्या जीवनात धनाची कमी नसते.
नाकाच्या मधोमध तीळ असेलेले
ज्या लोकांच्या नाकाच्या मधोमध तीळ असते अशा लोकांना कामामध्ये कोणाचाही हस्तक्षेप झालेला अजिबात आवडत नाही. हे लोक दुसऱ्यांचा चेहऱ्यावरून स्वभाव ओळखण्यात निपूण असतात.
तसेच हे लोक कलाप्रेमी आणि कलेची जाण ठेवणारे असतात. ते त्यांच्या क्षेत्रातही चांगली प्रतिष्ठा मिळवतात. हे लोक थोडे आळशीही असू शकतात ज्यामुळे त्यांना नुकसानही भोगावे लागू शकते.
नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असणारे
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असते ते लोक टेकनिकल माइंड सेटचे असतात. तसेच हे लोक इंजीनियरींग लाइनमध्ये मोठं नाव कमावतात. असे लोक फार कलात्मक असतात.
असे लोक नोकरीत उच्चपद भूषवतात. तसेच हे लोक पैसे खर्च करण्यातही अग्रेसर असतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.