Shardiya Navratri  sakal
संस्कृती

Shardiya Navratri 2023: नवरात्रीपूर्वी करा घराची सफाई, देवीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी ठेवा घरा बाहेर

Aishwarya Musale

नवरात्रीच्या दिवसात दुर्गा देवीची पूजा करणे विशेष फलदायी आहे. या काळात पूजेचे फायदेही लवकर मिळतात. याचे कारण म्हणजे माता दुर्गा नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकते.

नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये जिथे जिथे दुर्गा देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते. नवरात्रीपूर्वीच लोक घरोघरी तयारीला लागतात.

शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आई अंबेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काही वस्तू बाहेर ठेवा, कारण या गोष्टी घरात नकारात्मकता आणतात. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया-

भंगलेली मूर्ती

कोणत्याही देवाची भंगलेली मूर्ती घरात ठेवू नये. हे शुभ मानले जात नाही. तुमच्या घरामध्ये भंगलेली मूर्ती असतील तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी त्या पाण्यात विसर्जन करा.

जुने शूज आणि चप्पल

तुमच्या घरात जुने शूज आणि चप्पल पडलेले असतील, जे तुम्ही वापरत नसाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका. वास्तु तज्ज्ञांच्या मते जुने शूज आणि चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.

बंद घडी

घरात बंद घड्याळ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते आणि घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातील बंद पडलेले घड्याळ आणि इतर अनावश्यक वस्तू काढून टाका.

तुटलेली काच

तुटलेला काच किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका.

फाटलेली धार्मिक पुस्तके

वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही घरात ठेवू नयेत. कोणतेही धार्मिक पुस्तके फाटले असेल तर ते नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SA: अफगाणिस्तानने इतिहास रचला! दक्षिण आफ्रिकेच्या ६१ धावांत पडल्या १० विकेट्स, १७७ धावांनी हरले

Latest Marathi News Updates : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील तीन ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथाॅन बैठका सुरू

iPhone Data Transfer : आयफोन घेण्याचा विचार करताय? मिनिटांत अँन्ड्रॉईडमधून ॲपलमध्ये ट्रांसफर करा डेटा,वाचा सोपी ट्रिक

Bigg Boss Marathi 5: एलिमिनेशनमध्ये नसतानाही वाइल्ड कार्ड संग्राम चौगुले घराबाहेर होणार? हे आहे कारण

Nashik Police : आणखी 85 टवाळखोरांवर कारवाई! कॉलेजरोड ते आडगावपर्यंत शाळा, महाविद्यालयांबाहेर पोलिस

SCROLL FOR NEXT