जोतिबाचा चार महिने बंद असणारा पालखी सोहळा परंपरेनुसार खंडेनवमीपासून सुरू होतो.
जोतिबा डोंगर : ‘जोतिबाच्या (Jyotiba Dongar) नावानं चांगभलं...’चा जयघोष आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरात आज सकाळी नऊ वाजता खंडेनवमीनिमित्त पहिला पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात झाला.
पहाटे दिवे ओवाळणीचा नयनरम्य सोहळा झाला. आज नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) नवव्या दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची श्रीकृष्ण रूपातील महापूजा बांधली होती.
आज पालखी सोहळ्यात सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थानचे अधीक्षक धैर्यशील तिवले, साहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर, पुजारी, ग्रामस्थ, देवसेवक, पश्चिम महाराष्ट्र समिती कर्मचारी व दहा गावकर, ग्रामस्थ, पुजारी, कर्मचारी, उंट, घोडा या मानाच्या प्राणी व लवाजमासह पालखी सोहळ्यात सहभागी झाले. पालखी विविधरंगी फुलांनी सजविली होती.
दुपारी बाराला धुपारती सोहळा मुख्य मंदिरात आला. त्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. आज (मंगळवारी) विजयादशमीनिमित्त सायंकाळी जोतिबा देवाची अंबारीतील महापूजा बांधण्यात येईल. सायंकाळी सहाला दक्षिण दरवाजावर सीम्मोलंघनाचा पारंपरिक सोहळा होईल. दरम्यान, जोतिबाचा चार महिने बंद असणारा पालखी सोहळा परंपरेनुसार खंडेनवमीपासून सुरू होतो. आता दर रविवारी व पौर्णिमेला सोहळा होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.