Sharvan somvar 21 feet tall idol of Lord Shankar in Nagpur sakal
संस्कृती

श्रावणी सोमवार : नागपूरमधील २१ फूट उंच भगवान शंकराची मूर्ती

अशोक डाहाके

केळवद : श्रावण महिन्यात अनेक श्रध्दाळू दर्शनासाठी कृतार्थ होऊन माघारी फिरतात. निसर्गसौंदर्याने नटलेले जिल्हयातील केळवद येथील कपिलेश्‍वर तीर्थस्थळावर पुरातन शिवलिंगाच्या दर्शनासाठी श्रावणात भाविकांची रीघ लागते. सावनेर तालुक्यातील केळवद येथील कपिलेश्‍वर तीर्थस्थळ व पर्यटनाला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवर असणारे कपिलेश्‍वर पर्यटनस्थळ पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने मन मोहित करते. या पवित्रस्थळी कपिलमुनी ऋषीने केलेली तपश्चर्या तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एकनिष्ठ उपासक रामस्वामी महाराजांच्या सहवासाने या स्थळाला एक वेगळे महत्व आहे, येथील पुरातन शिवलिंग सदैव भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते.

नजीकच्या रायबासा तलावातून वाहणाऱ्या खळखळत्या पाण्याचा प्रवाह येथे धबधब्यात रुपांतरीत होतो. १५ फूट उंचीवरुन पडणारा नैसर्गिक धबधबा पर्यटकांचे मन जिंकतो. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा, बैतुल या जिल्ह्यासह विदर्भातील पर्यटक आणि भाविक येथे मोठया प्रमाणात येतात. या ठिकाणी असलेले पुरातन शिवलिंग, मंदिराच्या गाभाऱ्यात शेकडो वर्षांपासून असलेली पिंपळाची दोन झाडे, आजही मोठया डौलात उभी आहेत. नव्याने बांधण्यात आलेले शिवमंदिर, रामस्वामी महाराजांचे समाधीस्थळ, दत्त मंदिर, दुर्गा मंदिर, तसेच ओसांडून वाहणारा धबधबा याच बाजूला स्थापलेली २१ फूट उंच भगवान शंकराची मूर्ती येथील सौंदर्यात भर घालते. श्रावण महिन्यात येथे हजारो भाविक या स्थळी शिवलिंगाचे दर्शन घेतात. श्रावण महिन्यात साजरा होणारा रामस्वामी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा, नागपंचमी, ऋषीपंचमी, महाशिवरात्री यात्रेच्या वेळी तसेच श्रावणमासात ‘हर बोला हर हर महादेवच्या’ गजरात केळवदच्या कपिलेश्‍वर मंदिराचा परिसर गजबजलेला असतो.

अनेक कामी झालीत, अनेक कामे करणे गरजेचे

जिल्ह्यात प्रसिध्द असणाऱ्या तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळावर येथील स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमुळे अनेक कामे झालीत, मात्र अजून येथील बरीच कामे शासकीय निधीअभावी प्रलंबित आहेत. यामध्ये या मंदिर परिसरातील नाल्या लगतच्या सर्व जागेवर कडा बांधकाम करणे, सभामंडप बांधकाम, मंदिर परिसरातील खाली जागेचे सौंदर्यीकरण करणे, मंदिर परिसराच्या रस्त्यावर दुतर्फा ‘स्ट्रीट लाइट’ लावणे, मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिर परिसराचे मोठे नुकसान झालेले आहे. स्थानिक ग्रामपंचायतने या मंदिर परिसरातील खाली जागेवर गावातील घाण कचरा टाकत असल्याने मंदिराच्या सौंदर्यावर याचा विपरीत परीणाम होत आहे, याकडे लक्ष देणे स्थानिक ग्रामपंचायतलाा गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT