Shravan 2024  esakal
संस्कृती

Shravan 2024 : पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? शिवामूठ वाहण्याचे काय आहे महत्व?

Shravan 2024 : आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Shravan 2024 : आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय महिना आहे. या महिन्यात अनेक सण-उत्सव आणि विविध प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात. श्रावण महिना महादेवांना पूर्णपणे समर्पित आहे. श्रावणात भगवान शंकरांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

यंदाच्या श्रावणात ५ श्रावणी सोमवार आहेत. त्यापैकी आजच्या या पहिल्या श्रावणी सोमवारी अनेक जण उपवास करतात. महादेवाच्या मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी धान्यांची शिवामूठ वाहिली जाते. ही धार्मिक परंपरा आजही जपली जाते. आजच्या पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहायची आहे. श्रावणात प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याचे महत्व काय? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

या श्रावण महिन्यात ५ श्रावणी सोमवार आले आहेत. त्यातील प्रत्येक श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहायची? ते सर्वात आधी जाणून घेऊयात.

  • ५ ऑगस्ट पहिला श्रावणी सोमवार – शिवामूठ तांदूळ

  • १२ ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार – शिवामूठ तीळ

  • १९ ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार – शिवामूठ मूग

  • २६ ऑगस्ट चौथा श्रावणी सोमवार – शिवामूठ जव

  • २ सप्टेंबर पाचवा श्रावणी सोमवार – शिवामूठ सातू

शिवामूठ वाहण्याचे काय आहे महत्व?

श्रावणात शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते. अनेक भाविक प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा-अर्चना, उपवास करतात. काही जण दुग्धाभिषेक, जलाभिषेक तर काही भाविक रूद्राभिषेक देखील करतात. शिवाय, प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची परंपरा आहे. याला आपण शिवामूठ असे म्हणतो.

ही शिवामूठ वाहण्याची धार्मिक परंपरा फार जुनी आहे. खरे तर शिवामूठ हा श्रावणाला मोठा वसा मानला जातो. प्रत्येक मुलीला लग्नानंतर वाटते की, जसे प्रेम आपल्याला माहेरी मिळते, तसेच सासरी देखील मिळावे. सासरच्या लोकांचे आपण आवडते व्यक्तिमत्व व्हावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. सासरच्या लोकांचे आपल्यावर प्रेम वाढावे, यासाठी श्रावणातील एक सण म्हणजे हा वसा आहे. हा वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या लोकांची आवडती बनते. श्रावणातील हा वसा म्हणजे शिवामूठ होय. याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे.

प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ वाहताना, ‘’शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासू-सासरा, दीरा-भावा, नणंदजावा भ्रतार, नावडतीची आवडती कर रे देवा’’, असे म्हणत ही शिवामूठ वाहिली जाते. महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी उपवास करावा आणि महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवामूठ श्रावणातील सर्वात मोठा वसा मानला जातो. ही शिवामूठ प्रत्येक महिलेने, प्रत्येक सोमवारी वाहावी, असे सांगितले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT