Shravan month 2022 Someshwar Fort Temple 
संस्कृती

नागपूर : निसर्गाच्या सान्निध्यात सोमेश्वर किल्ला देवस्थान

पर्यटनाची चांगली संधी, जीर्णोउद्धारासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान

मनोज खुटाटे

जलालखेडा : नागपूर - वरुड राज्यमार्गावर नागपूरपासून ८० किलोमिटरपासून दूर जलालखेडामध्ये वर्धा व जाम नदीच्या संगमावर, नदीने वेढलेला किल्ला आहे. या किल्ल्यात अतिप्राचीन शिवमंदिर असून यात स्वयंभू जागृत शिवलिंग आहे. हा परिसर नदीने वेढला असून निसर्गाचे खरे दर्शन होते.

जलालखेडा येथील किल्ल्यातील शिवमंदिर सगळीकडून नदीने वेढेलेले असून किल्ल्यात जाण्यासाठी नदी पार करावीच लागते. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर लहान पूल भक्तांसाठी करण्यात आला आहे. या किल्ल्याला आठ बुरुज होते, ते आता धराशायी झाले आहे. पण भिंती अद्यापही कायम आहेत. शिवमंदिराबाबत असे म्हणतात की प्राचीन काळात येथील शिवलिंग सोन्याचे होते. याचे दर्शन करणाऱ्यांना ते पुढच्या जन्मी कोणत्या रुपात जन्म घेणार आहे याची महती आहे. या मंदिरात सापांचा वास असल्यामुळे धार्मिक कार्य व महाशिवरात्री शिवाय अन्य दिवशी रात्री कोणीच थांबत नाही.

मागे काही वर्षांपूर्वी चोरांनी ही पिंड खोदून नेण्याचा प्रयत्न केला होता. पण सापांच्या प्रकोपामुळे ते यात यशस्वी होऊ शकले नाही. याच किल्ल्यात महाकालीचे मंदिर टेकडीवर आहे. या मंदिराचा दिवा वर्धा जिल्ह्यातील आष्टी या गावातून दिसतो. याचेप्रमाणे गंगामंदीर, ऋषी मंदिर देखील आहे. आता तर सनी देवाची ही प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. संगमावर स्नान करण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात. नवरात्री, ऋषीपंचमी, श्रावण महिना आणि महाशिवरात्री या सणावर मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. वाकाटक या राष्ट्रकुटच्या वेळीचे हे मंदिर असण्याची संभावना आहे. प्रथम रघूजीराजे नंतर त्यांचे पुत्र जानोजीराव आले.

त्यावेळी माधवराव पेशवे यांनी जागोजीराव यांच्यावर आक्रमण केले होते. तेव्हा माधवरावांची सेना बीड, पयथि, नाडसी, ब्राम्हणी, कळमनुरी, वाशीम, मंगळूपीर, पिंजर, कारंजा, अमरावती, वरुड, आमनेर, या मार्गाने येऊन त्यांनी २०जानेवारी१७६९ ला हा किल्ला हस्तगत केला होता. तेथून मग ते नागपूरला आले होते.

तेव्हापासून हा प्रदेश नागपूरचे भोसले यांच्या अधिपत्याखाली आला. यानंतर सन १८१८ मध्ये अपद्स्थ सेनासाहेब सुभा अप्पासाहेब भोसले यांनी इंग्रजाच्या कैदेतून सुटून नरखेड, बैतुल, आमनेर या क्षेत्रावर वर्चस्व स्थापित केले. नंतर इंग्रजांनी सेनेच्या ताकदीवर या वर्चस्वाला दाबून दिले. १८२० ते १९४७ पर्यंत हा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात राहिला. या देवस्थानच्या पुनर्निर्मितीचे काम १९ फेब्रुवारी १९७० ला भानापुरा पीठाचे जगतगुरू शंकराचार्य स्वामी सत्यावित्रानंद यांच्या उपस्थितीत केले गेले.

जीर्णोउद्धाराचे कार्य सुरु

मागील काही वर्षांपासून जीर्णोउद्धारासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे योगदान लाभत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख, माजी जि. प. सदस्य बंडोपंत उमरकर, यांच्या प्रयत्नाने याला पर्यटन क्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळाला होता. कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री रणजीत देशमुख व आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रयत्नाने आता पर्यटनक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT