श्रावण महिना आणि भगवान महादेवांची पूजा Esakal
संस्कृती

Shravan Maas 2023: भगवान महादेवांना श्रावण महिना का आहे प्रिय

महादेवांना Bhagwan Mahadev श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून श्रावणामध्ये खास करून श्रावणी सोमवारचे व्रत करून महादेवांना प्रसन्न करता येतं. या काळात महादेवांची पूजा केल्यास त्यांची कृपादृष्टी राहते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात

Kirti Wadkar

अनेक कवी आणि लेखकांनी श्रावणाचं Shravan खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. श्रावणामध्ये निसर्गाचं खुललेलं सौदर्य मन भारावून टाकणारं असतं. अशाच या सुंदर श्रावण महिन्याला हिंदू धर्मातही Hindu Religion अत्यंत महत्वाचं स्थान आहे. Shravan Month and Bhagwan Mahadev Pooja

श्रावण महिना Shravan हा खास करून भगवान शंकर म्हणजे महादेवाला समर्पित असतो. म्हणून या काळामध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते.

भगवान महादेवांना Bhagwan Mahadev श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून श्रावणामध्ये खास करून श्रावणी सोमवारचे व्रत करून महादेवाला प्रसन्न करता येतं. या काळात महादेवांची पूजा केल्यास त्याची कृपादृष्टी राहते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

यंदा महादेवाची पूजा करण्यासाठी भक्ताना जास्त संधी मिळणार आहे. कारण यंदाच्या वर्षी श्रावणास हा दोन महिन्यांचा असणार आहे.

१९ वर्षांनी आला योग

यंदा अधिक महिना आल्याने श्रावणमास हा ५९ दिवसांचा असणार आहे. जवळपास १९ वर्षांनी एवढ्या मोठ्या कालावधीसाठी म्हणजेच २ महिन्यांचा श्रावण महिना येण्याचा योग आला आहे.

हिंदू पंचांगानुसार १८ जुलै २०२३ पासून श्रावणाला सुरूवात होईल तर १५ सप्टेंबरला श्रावण मासारंभ असेल. म्हणजेच यंदाच्या वर्षी जवळपास २ महिने महादेवाची पूजा आणि सेवा करण्याचं भाग्य भक्तांना लाभलं आहे. दरवर्षी श्रावणामध्ये ४-५ श्रावणी सोमवार येतात. यंदा श्रावणामध्ये ८ श्रावणी सोमवार आले आहेत. २४ जुलैला पहिला श्रावणी सोमवार असेल तर ११ सप्टेंबरला शेवटचा श्रावणी सोमवार असेल.

हे देखिल वाचा-

महादेवाला का आहे श्रावण महिना प्रिय?

पुराणातील कथेनुसार जेव्हा दक्षपुत्र सतीने आपले प्राण त्यागले, तेव्हा महादेवांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ते घोर तपस्येमध्ये लीन झाले. त्यानंतर सतीने हिमालय पुत्री पार्वतीच्या रुपामध्ये जन्म घेतला आणि महादेव आपले पती व्हावे म्हणून कठोर तप केलं. पार्वतीच्या भक्तीवर प्रसन्न होवून महादेवाने तिची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पार्वतीशी विवाह केला.

महादेव आणि पार्वती माता या मासामध्ये म्हणजेच महिन्यात एकत्र आल्याने हा महिना महादेवांसाठी प्रिय मानला जातो. म्हणून या महिन्यात महादेवांसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते. म्हणूनच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या व्रतासोबतच मंगळागौर साजरी करत माता पार्वतीचंही पूजन केलं जातं.

पुराणातील विविध कथा

श्रावण महिन्याबद्दल पुराणामध्ये विविध कथा आढळतात. अर्थात या विविध कथांमधून महादेवांच्या भक्तीचा महिमा किंवा महादेवाच्या पूजेचं महत्व अधोरेखित केलं जातं.

काही पौराणिक कथांमधील वर्णनानुसार श्रावण महिन्यातच महादेवाने समुद्र मंथन केलं होतं. यावेळी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल म्हणजेच विष प्राशन करून महादेवाने सृष्टीचं आणि देवांचं रक्षण केलं.

विष प्यायल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या कंठात साठवलं. त्यानंतर या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी महादेवांवर जलाभिषेक केला. म्हणूनच श्रावणमासामध्ये महादेवांचा अभिषेक केला जातो आणि त्यांना प्रसन्न केलं जातं.

महादेवांचा श्रावणमास

शास्त्रांमध्ये वर्णन केल्यानुसार श्रावणमासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. हा काळ साधु संतासाठी अमूल्य असतो. तसचं विष्णू योगनिद्रेत असल्याने त्यानंतर भगवान शिव विश्व चालवण्याची जबाबदारी स्वीकारतात. म्हणूनच महादेव श्रावणाचे प्रमुख मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT