gul shengdana ladoo recipe in marath Esakal
संस्कृती

Shravan Somvar 2022: गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

शेंगदाण्याचे लाडू हे खायला चविष्ट असतातच,सोबतच शरीरासाठी आरोग्यदायी देखील असतात.

सकाळ डिजिटल टीम

शेंगदाण्याचे लाडू फक्त खायला चविष्ट असतातच सोबतच शरीरासाठी आरोग्यदायी देखील असतात. ते सहसा हिवाळ्यात तसेच उपवासाच्या दिवसात खाल्ले जातात. कारण ते खाण्यासाठी पौष्टिक आणि शरीरासाठी आरोग्यदायी असतात. तस पाहिलं तर दररोज थोडासा गूळ आणि मुठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप उत्तम असतं पण या दोन गोष्टी स्वतंत्रपणे खाण्यात आपण आळस करतो. त्यामुळे अशा वेळी त्यांचे लाडू बनवून ठेव कधी उत्तम ठरू शकतं.(Gul Shengdana Ladoo Recipe)

कारण घरात जर लाडू तयार असले तर माणसांला हवं तेव्हा लाडू उचलून खाता येतात. चला तर मग बघू या श्रावण सोमवार स्पेशल गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

साहित्य:

अर्धा किलो शेंगदाणे

अर्धा किलो गूळ

जायफळ पावडर आवडीप्रमाणे.

कृती:

गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम लोखंडी कढईत शेंगदाणे टाकून ते मंद आचेवर एकदम खरपूस भाजून घ्यावे.

शेंगदाणे खरपूस भाजल्यावर गॅस बंद करावा.आणि भाजलेले शेंगदाणे एका मोठ्या परातीत काढून थंड होऊ द्यावे.

शेंगदाणे थंड झाल्यावर दोन्ही हातांनी मॅश करून त्याची साले काढून ते शेंगदाणे चांगले फटकून घ्यावे.

नंतर चाकूच्या मदतीने गुळाचे छोटे तुकडे करावे.

आता मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेले शेंगदाणे, थोडा गूळ, आणि जायफळ पावडर घालून बारीक करावे.आता हे मिश्रण एका भांड्यात काढा.

त्याचप्रमाणे उरलेला गूळ आणि शेंगदाणे एकत्र बारीक करून एका भांड्यात काढून चांगले मिसळा.

गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवण्याचे मिश्रण तयार आहे. हे मिश्रण चांगले एकजीव करून त्यांचे मस्त लाडू बांधून घ्यावे.

गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. ते एका स्टिलच्या डब्यात ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT