shravan Somvar 2022 shivamuth how to do puja vidhi vrat significance in marathi 
संस्कृती

Shravan Somvar 2022 : पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहण्यामागचा भक्तिभाव जाणून घ्या

आषाढाच्या देवशयनी एकादशी पासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी पर्यंतच्या काळात अनेकविध धार्मिक सोहळे, परंपरा साजरे केले जातात

सकाळ वृत्तसेवा

आषाढाच्या देवशयनी एकादशी पासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी पर्यंतच्या काळात भारतीय मनाच्या भाव भक्तीचे अनेकविध आविष्कार, धार्मिक सोहळे, उत्सव, सण, समारंभ, रीति, परंपरा या कालात भरभरून साजरे केले जातात. हा काळ जणू भक्ती आणि अध्यात्म यांचे प्रकाश पर्वच असते. तन मनाने आपल्या आराध्य देवतेशी एकरूप होऊन ऐहिक आणि पारमार्थिक आनंदाचा ठेवा संपादनाचा, पुण्यसंचयाचा, जगण्यासाठी मनसोक्त ऊर्जा देणारा हा काल! त्यामुळे पूजा पाठ, व्रत वैकल्य, पारायण अशा अनेक धार्मिक कार्यात सर्व भारतीयांचा सहभाग सर्वत्र दिसून येतो. आषाढ पौर्णिमेच्या गुरुतत्वाशी एकरूप झालेले मन आषाढ अमावस्येला दीप पूजन करून पुढे येणाऱ्या सर्व सणांचे स्वागत करते. प्रकाशपूजक भारतीय मन ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना करून भावभक्तीमय श्रावण महिन्याचे स्वागत करायला सज्ज होतो.

श्रावण म्हणजे ‘पवित्रोऽहं पवित्र’ असा महिना. यातला सर्व वार पुण्यकारकच. या महिन्यात उपास-तापास, देवधर्म यांचे प्राबल्य. महिला मुळातच धार्मिक आणि कुटुंबवत्सल. आपले कुटुंब सुखा समाधानात राहण्यासाठी कुलधर्म आणि कुलाचार सांभाळण्याची जबाबदारी त्याआपसुकच स्वीकारतात.

रिमझिम बरसणाऱ्या पावसातील श्रावण सोमवार हा भगवान शंकराचा वार. जिथे जलधारा तिथे शंकर पिंडीच्या रूपात भावमग्न असतात. शं म्हणजे शुभ आणि पवित्र, सगळ्यांचे कल्याण करणारा. आपण मनोरथ सांगावे आणि ते त्यांनी पुरे करावे एव्हढा सरळ साधा देव. श्रावणी सोमवारी घरात किंवा मंदिरात रूद्र, अतिरुद्र, महारूद्र, महिम्न अशी सारी पुजाकर्म. अशावेळी स्त्रीवर्ग आपल्या साध्या सुध्या भक्ती भावाला व्यक्त करताना पत्र, पुष्प, फलं, तोयं हीच सामग्री मनापासून अर्पण करतात. श्रावणात दर सोमवारी शिवामूठ वाहण्याचे व्रत करायला सांगितले जाते.

पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून मुठभर तांदूळ ओले करून पिंडीवर उभी मूठ धरून वाहताना म्हणायचे, ‘शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा’ किंवा ‘शिवा शिवा महादेवा माझी मूठ स्वीकारा देवा’ किंवा ‘मनातल्या इच्छा पूर्ण करा रे देवा’ असे म्हणून मुठीतले तांदूळ पिंडीवर वहायचे. कुणी कुणी शिवामूठ वाहताना दुसऱ्या हाताने त्यावर हळूहळू पाण्याची धार पण सोडतात. हे व्रत पाच वर्षे श्रावणातील चार अथवा कधी कधी पाच सोमवार करून झाल्यावर त्याचे उद्यापन करून दान धर्म करायचा आणि या व्रताची सांगता करायची अशी प्रथा आहे.

शिवामुठ आणि तांदूळ

पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहण्यामागे तत्त्व नक्कीच आहे. जीव मात्राचे उदरभरण हा एक यज्ञ आहे. त्यात अन्न हे पूर्णब्रह्म आहे. तांदूळ हे जगातील बहुतांशी लोकांचे आहारातील मुख्य अन्नधान्य आहे. आबाल वृद्ध सर्वांसाठी सहज पचन होणारे आणि त्वरित भूक शमन करणारे धान्य आहे. त्यातले पोषक घटक शरीर समृद्ध करणारे म्हणून जे जे आपल्यासाठी उपकारक ते ते कृतज्ञ बुद्धीने ईश्वराला अर्पण करणे हा सदभाव आहे. बहुतांशी सर्व धार्मिक कार्यात तांदळाला प्राधान्य आहे. लग्न मुंज यात अक्षतासाठी तसेच देवी व अन्य धार्मिक कार्यात ओटी भरण्यासाठी, देव देवतांच्या आवाहन-विसर्जनासाठी, आशीर्वाद औक्षणाच्या मंत्राक्षतासाठी, यज्ञात आहुतीसाठी, नैवैद्यात चित्राहुतीसाठी प्रत्येक वेळी तांदळाला अग्रस्थान आहे. यावरून आपल्या आरोग्याला सबल करणारे, जीवनाला समृद्ध बनवणारे आहारातील सर्वोत्तम धान्य तांदूळ शिवशंकराला अर्पण करणे हाच भक्तिभाव या तांदळाच्या शिवामुठीत गृहित आहे.

- डॉ. मृणालिनी जमदग्नी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT