water sakal
संस्कृती

Sri Family Guide : समृद्धी जलाची अन् आरोग्याची

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद

श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम अंतर्गत वार्षिक सबस्क्रीप्शन घेतलेल्या सर्वांना श्री फॅमिली गाईड स्टडी मटेरिअल पुस्तिका आपण देत आहोत. या स्टडी मटेरिअलमध्ये विविध अभिजात मूल्यांचा व माहितीचा खजिनाच देत आहोत. या पुस्तिकेमध्ये कुटुंबाला मार्गदर्शक अशी सर्व माहिती आहे. यातून स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला एक वेगळी दिशा मिळू शकते. श्री फॅमिली गाईड स्टडी मटेरिअल पुस्तिकेमध्ये देत असलेली माहिती सारांशरूपाने या पुरवणीच्या माध्यमातून देत आहोत.

पंचमहाभूतांपैकी जल आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतो. आपल्या शरीरात हे प्रत्येक कोसिकाचेसुद्धा अस्तित्व या पाण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे पाणी हेच जीवन आहे, असेही म्हटले जाते. वैद्यकशास्त्राच्या मते, आपल्या सर्वांच्या शरीरातला साधारण साठ ते सत्तर टक्‍के भाग हा पाण्यानेच बनलेला असतो. त्यामुळेच आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शरीरामध्ये योग्य प्रकारचे, योग्य प्रमाणात पाणी अर्थात जलमहाभूत देणे गरजेचे आहे, हे सांगायची खरे तर आवश्यकताच नाही. जसजसे आपण आधुनिकतेकडे वळतो आहोत, तसतसे प्यायच्या पाण्याचा साठा पृथ्वीवरती कमी होत चाललेला आहे.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की, भविष्यात संपत्ती ही सोन्यामध्ये नव्हे, तर पाण्यामध्ये मोजली जाईल. भूजलस्तर कमी होत चाललेला आहे, तसतसे पाण्याचे महत्त्व आपल्याला जास्त जाणवायला लागेल. श्रीगुरूजी नेहमी म्हणायचे की, पाणी म्हणजे सर्व प्राणिमात्रांसाठी परमेश्‍वराचे किंवा निसर्गाचे असलेले प्रेम आहे. प्रेम अर्थात ओलावा आणि प्रेम, ओलावा जीवनात नसला तर जीवनाला काही अर्थच राहणार नाही. पाण्याचा स्तर आयुर्वेदाच्या मते आपल्या शरीरात कफदोषाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT