Dhantrayodashi Esakal
संस्कृती

Dhanteras: धनत्रयोदशीच्या दिवशी तुमचे जुने दागिने घरच्या घरी नव्यासारखे चमकवण्यासाठी या सोप्या टिप्स

Diwali 2024: दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण… चार ते पाच दिवसांचा दिवाळसण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण जल्लोषात साजरा करतात. दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. म्हणजेच वसूबारसनंतर धनत्रयोदशी येते. हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. 

दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी खास करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने घालतात. पण हे दागिने वर्षानुवर्षे जुणे असतात मग त्यांना चमक आणण्यासाठी महिला मंडळी जरी घराची साफसफाई करतात तशीच आपल्या दागदागिण्यांची सुध्दा साफसफाई करतात. पण घरातील जुण्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांना नवीन चमक आणणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्याचबरोबर दागिने पॉलिश करण्यासाठीही वेळही प्रचंड लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमचे दागिने घरच्या घरी साफ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही सर्व सोन्या-चांदीचे दागिने नव्यासारखे बनवू शकता.

1) तुम्ही डिशवॉश पावडरच्या मदतीने दागिन्यांमध्ये साचलेली घाण सहज साफ करू शकता. यासाठी कोमट पाण्यात डिशवॉश पावडर मिसळा. या मिश्रणात सोन्या-चांदीचे दागिने घालून तसेच ठेवून द्या. काही वेळाने टूथब्रशने हलकेच घासल्यास दागिने लगेच चमकतील.

2) तुम्ही अमोनिया वापरून सोन्या-चांदीचे दागिने देखील स्वच्छ करू शकता. यासाठी कोमट पाण्यात अमोनिया पावडर मिसळून दागिने त्यात ठेवा. आता दोन मिनिटांनी ब्रशने घासल्याने दागिने लगेच साफ होतील. पण लक्षात ठेवा की, मोती किंवा इतर रत्नांसाठी अमोनिया अजिबात वापरू नका.

3) तुम्ही तुमचे चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा उत्तम वापर केला जातो. यासाठी चांदीच्या दागिन्यांवर टूथपेस्ट लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. आता टूथब्रशच्या साहाय्याने दागिने हलके चोळून कोमट पाण्याने दागिने धुवा. यामुळे तुमचे चांदीचे दागिने एकदम नवीन दिसतील.

4) घरातील मिठाने देखील दागिने चमकतील ते कसे पाहु या, सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाचीही मदत घेऊ शकता. यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून दागिने त्यात ठेवा. यानंतर दागिने ब्रशने हलके चोळून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या दागिन्यांतील घाण सहज निघून जाईल.

5) चांदीच्या दागिन्यांची चमक परत आणण्यासाठी तुम्ही सिल्व्हर पॉलिश देखील वापरून पाहू शकता. यासाठी चांदीच्या दागिन्यांना सिल्व्हर पॉलिश लावून घासून घ्या. नंतर दागिने कोमट पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून काढा. यामुळे तुमचे दागिने नव्यासारखे चमकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT