Mahadev Tripurari Purnima 2022  Google
संस्कृती

Tripurari Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमेला का म्हणतात त्रिपुरारी पाहुया काय आहे त्या मागची पौराणिक कथा

हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा आज आहे. आजच्या दिवशी गंगेत स्नान करण्याने मोठे पुण्य मिळते अशी भावना आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tripurari Purnima importance : हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा आज आहे. आजच्या दिवशी गंगेत स्नान करण्याने मोठे पुण्य मिळते अशी भावना आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दिपोत्सवही साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराने अखंड भूमीवरूल जनतेला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाचे तीन पुत्रांचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवसाबद्दल अधिक जाणून घेऊयात.

पुराणांमध्ये हा दिवस स्नान, उपवास आणि तपस्या या संदर्भात मोक्ष प्रदान करणारा आहे. त्याचे महत्त्व केवळ भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे. कारण या दिवशी भगवान विष्णूचा पहिला अवतार झाला असे मानले जाते. मत्स्य पुराणानुसार प्रलय संपेपर्यंत वेदांचे रक्षण करण्यासाठी सप्तऋषी, धान्य आणि राजा सत्यव्रत यांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य म्हणजेच माशाच्या रूपात पहिला अवतार घेतला. त्यामुळे विश्वाची निर्मिती पुन्हा सोपी झाली अशी माहिती पुराणात मिळते. शिवभक्तांच्या मते, या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या तीन पुत्रांचा वध केला. ज्यावरून त्याची त्रिपुरारी म्हणून पूजा केली जात असे. त्यामुळे याला 'त्रिपुरारी पौर्णिमा' असेही म्हणतात. जाणून घेऊयात या दिवसाचा मागची पौराणिक कथा.

भगवान शंकरांनी केला त्रिपुरासुराचा वध 

त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रम्हदेवाचे खडतर असे तप केले. ब्रम्हदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडून असा आशीर्वाद मागितला की, मला या पुढे कोणाचेही भय राहणार नाही. पण हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो फारच उन्मत्त झाला. तो देवांनाही त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराचा वध करायचे देवांनी ठरवले. पण त्रिपुरासुराची तटबंदी ही अभेद्य होती. त्यामुळे त्यांना त्रिपुरासुराचा वध करता येत नव्हता. अखेर सगळ्यांनी शंकर देवाला बोलावणी केली. तेव्हा शंकरांनी तिन्ही नगरे जाळून त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा वध झाल्यामुळेच हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. त्या दिवशी घराबाहेर सगळ्यांनी दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला.

तारक्ष ,कमलाक्ष,विन्दुन्माली यांच्या राज्यांची होळी

तारकासुर नावाचा एक असूर होता. त्याला तीन मुलं होती. तारक्ष ,कमलाक्ष,विन्दुन्माली नावाची तीन पुत्रे होती. या तिन्ही पुत्रांना त्यांनी आपले राज्य वाटून दिले होते. देवांना कोणताही त्रास देऊ नका. असे त्याने त्या मुलांना बजावले होते. पण असे असून देखील त्यांनी देवांना आणि लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. लोकांना देणारा त्रास पाहात भगवान शंकराने या मुलांच्या तिन्ही राज्यांची होळी करुन त्यांचा वध केला. म्हणूनच या दिवसाचे महत्व हे खास मानले जाते.

त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करतात ?

जर या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला ‘महाकार्तिकी पौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी शिवमंदिरामध्ये, घराबाहेर दिव्यांची आरास केली जाते. मंदिरासमोर असणाऱ्या दगडी दीपमाळा स्वच्छ करून तिथे दिवे लावले जातात. दिव्यांची मोठी आरास घरांमध्ये, घराबाहेर, मंदिरांमध्ये असते म्हणून या कार्तिकी पौर्णिमेस ‘देव दिवाळी‘ असेदेखील म्हटले जाते.

कार्तिक पौर्णिमेचा दिवस उत्तर प्रदेशात स्कंदजयंती म्हणून मानतात. यादिवशी स्कंदमूर्तीची (कार्तिकेयाची) पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतांना जर स्कंदाचे (कार्तिकेयाचे) दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा कालात चंद्र कृत्तिका नक्षत्रात नाही. त्यामुळे यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीची मंदिरे दर्शनासाठी उघडणार नाहीत. यावर्षी कार्तिकस्वामी दर्शन योग नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT