Tulsi vivah 2023  esakal
संस्कृती

Tulsi vivah 2023 : तुळशी विवाहाच्या दिवशी हातात ‘या’ गोष्टी ठेवून तुळशीला घाला प्रदक्षिणा

आजच्या दिवशी तुळशीला प्रदक्षिणा घालणे हे शुभ मानले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Tulsi vivah 2023 : हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या विवाहाला फार महत्व आहे. देवउठणी अर्थात प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या तिथीला शाळिग्राम आणि तुळशीचा विवाह केला जातो.

आज तुळशीचा विवाह असून आजच्या दिवशी भगवान विष्णूंची शाळिग्राम रूपात तुळशीसोबत विवाह करण्याची परंपरा आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आजच्या दिवसापासूनच शुभ कार्याला सुरूवात केली जाते. आज तुळशी विवाह असून आजच्या दिवशी तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होते, असे मानले जाते. परंतु, ही प्रदक्षिणा घालताना हातात काही गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते.

कोणत्या आहेत त्या गोष्टी? ज्या तुम्ही हातात घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या गोष्टी हातात घेऊन तुळशीला घालावी प्रदक्षिणा :

तीळ

तुळशीचा विवाह केल्यानंतर हातात काळे तीळ घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घालावी. हातात काळे तीळ घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळते, असे मानले जाते. त्यामुळे, हातात काळे तीळ घेऊन तुळशीला जरूर प्रदक्षिणा घालावी.

गहू

तुळशीचा विवाह केल्यानंतर हातात गहू घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घालावी. हातात गहू घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने बिघडलेली कामे लवकर पूर्ण होतात. तसेच, अनेक शुभ कार्ये सफल होतात अशी देखील मान्यता आहे.

तुळशीची मंजिरी आणि हळद

तुळशीचा विवाह पार पडल्यानंतर हातात तुळशीची मंजिरी आणि त्यासोबत चिमूटभर हळद घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घालावी. असे केल्याने तुम्हाला लवकरच विवाहाचा प्रस्ताव मिळू शकतो. तसेच, वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होते, असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT