Tulsi Vivah sakal
संस्कृती

Tulsi Vivah 2023: आज आहे तुळशी विवाह, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व आहे.

Aishwarya Musale

Tulsi Vivah 2023 : हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व आहे. तुळशीची पानं प्रत्येक शुभ कार्यात वापरले जातात. तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केला जातो.  या विशेष दिवशी लोक दरवर्षी तुळशी विवाहाचे आयोजन करतात. हा उत्सव वृंदावन, मथुरा आणि नाथद्वारा येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

हिंदूंमध्ये तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपात तुळशीचा विवाह लावण्याचा विधी आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला हा सण साजरा केला जातो.

तुळशीविवाह कधी?

दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाह हा साजरा केला जातो, पण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी 23 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. अनेक जण द्वादशी तिथीला तुळशीमाता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधी करतात.

शुभ मुहूर्त

पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल. शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 वाजता संपेल. उदयतिथीचा विचार करून तुळशी विवाह आज अर्थात 24 नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे.

मंत्र

तुलसी श्रीमहालक्ष्मीरविद्या यशस्विनी ।

धर्मया धर्मान्ना देवी देवीदेवमनः प्रिया ।

लाभे सूत्र भक्तिमंते विष्णुपदम् लभेते ।

तुलसी भूरमहलक्ष्मी: पद्मिनी श्रीहरहरप्रिया।

भगवान विष्णूचा मंत्र

ओम नमो नारायणाय नमः

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

तुळशी विवाहाचे महत्त्व

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला धार्मिक महत्त्व आहे. तुळशीमातेसोबत भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा या दिवशी विवाह आयोजित केला जातो. विधीनुसार या दिवशी तुळशी-शाळीग्राम विवाह आयोजित केल्याने जीवनात सकारात्मकता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT