संस्कृती

Vastu Tips : तिजोरीत या गोष्टी ठेवणे असते शुभ, होते सुख समृद्धी आणि धनवृद्धी

तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य बाब असलेला पैसा योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवल्यास तुम्हाला अधिक धनवृद्धी होऊ शकते.

Aishwarya Musale

आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे वास्तुशास्त्रात म्हटल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या तर आपोआप घरात सुख, समृद्धी टिकून राहते.

तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य बाब असलेला पैसा योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवल्यास तुम्हाला अधिक धनवृद्धी होऊ शकते. मात्र, त्यांची दिशा चुकल्यास नुकसान, समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जाते.

तिजोरीत पैशाची जागा असते, तिजोरीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो, असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सुपारी हे श्री गणेशाचे प्रतीक मानले जाते. याशिवाय सुपारी हे संपत्तीचे सूचक आहे. अशा स्थितीत घरातील सर्व संपत्ती ज्या ठिकाणी ठेवली जाते त्या ठिकाणी सुपारी अवश्य ठेवावी.

वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ लाल कपड्यात 7 कवड्या बांधून ठेवाव्यात. असे केल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल आणि तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासत नाही.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ज्या ठिकाणी पैसाची तिजोरी ठेवलेली असते त्या ठिकाणी काही नव्या नोटा ठेवल्या तर तिथे लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. फक्त या नोटा ठेवताना 10 रुपये,20 रुपये,100 रुपये,500 रूपये अशी प्रत्येकी एक कोरी नोट घराच्या लॉकरमध्ये, तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी.आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे या नोटा जुन्या ठेवल्या तर काहीच फायदा होणार नाही.

आपल्या हिंदु संस्कृतीत भगवान कुबेर यांना संपत्तीचे देवता मानले जाते. त्यामुळे कुबेरची मूर्ती किंवा फोटो लॉकर, तिजोरी किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवावा. याने धन आणि लाभाचा उत्तम योग तयार होतो आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते.

निरुपयोगी वस्तू कधीही तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवू नका. कधी-कधी बाहेर ठेवायच्या वस्तू आपण लॉकरमध्ये ठेवतो. जसे की कोणतीही कागदपत्रे, चावी, फोटो किंवा इतर काही वस्तू तिजोरीत ठेवणे टाळा. लॉकरमध्ये फक्त पैसे किंवा त्याच्याशी संबंधित वस्तू ठेवाव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT