शास्त्रात पितरं नाराज होणं अशुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की, पितृदोषाने माणसाचे संपूर्ण जीवन अस्ताव्यास्त होते. कोणत्याही कामात फार अडचणी येतात. याबरोबर वैवाहिक जीवनात तणाव, आर्थिक ताण, मुलांशी निगडीत समस्या निर्माण होतात. आता वास्तूशास्त्रानुसार पितृदोषाचे संकेत कोणते जाणून घेऊ.
घरात पिंपळाचे झाड उगणे
वास्तू आणि हिंदू धर्मानुसार घरात पिंपळाचे झाड उगणे हे अशुभ मानले जाते. जर कोणाच्या घरी पुन्हा पुन्हा पिंपळाचे झाड उगत असेल तर ही पितृदोषाची खूण आहे. तुमचे पितरं नाराज असल्याचा तो संकेत मानला जातो. अशा परिस्थितीत ते रोप मुळासहित उखडून नदीत वाहून द्यावे. अमावस्येला गरिबांना दान करावे. आर्थिक क्षमता असल्यास गरिब मुलांना पांढरे कपडे दान करावे. यामुळे पितृदोष मुक्त होतो.
एखाद्या कामासाठी खूप विचार करणे
जर कोणा एखाद्या गोष्टीचा अती व्चार करत असेल आणि फसलो आहे असे वाटत असेल तर हे चांगले संकेत नाहीत. तज्ज्ञांच्या मते यामागे पितृदोष असू शकतो. अवाजवी विचार करणे माणसाला मानसिक रूग्ण करू शकते. असे पत्रिकेत चंद्र बिघडल्यानेपण घडू शकते. नियमित दिनश्चर्या नीट न पाळल्याने पतिर्केतील चंद्र दूषित होतो. अशा परिस्थितीत शिवलिंगावर नियमितिरत्या जल अर्पण करण्यास सांगितले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.