Vat Purnima 2024 esakal
संस्कृती

Vat Purnima 2024 : आज वटपौर्णिमेचा सण..! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व अन् पुजेची पद्धत

2024 Vat Purnima: आज वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Vat Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार एका वर्षात १२ पौर्णिमा असतात. या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज वटपौर्णिमा असून, आजच्या दिवशी सूवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.

वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ही ओळखला जातो. या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची कथा वाचली किंवा ऐकली जाते. आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते, तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो. यंदा ज्येष्ठ वटपौर्णिमा आज (२१ जून २०२४) साजरी केली जाणार आहे. यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि या वटपौर्णिमेचे महत्व काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात.  

वटपौर्णिमा तिथी

यंदा वटपौर्णिमेचा सण आज (२१ जूनला) साजरा केला जाणार आहे. वटपौर्णिमा तिथी २१ जूनला सायंकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल आणि २२ जून रोजी सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल.

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी?

वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात. या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे ५ वाजून २४ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

त्यानंतरचा, शुभ मुहूर्त हा दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी सुरू होणार असून, तो दुपारी २ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये सूवासिनी वडाची पूजा करू शकतात.

वटपौर्णिमेचे महत्व

वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्रमा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार, वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे, वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे. यासोबतच वडाचे झाड हे १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगते, त्यामुळे, या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात, आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

वटपौर्णिमेची पूजा कशी करायची?

  • वटपौर्णिमेच्या दिवशी सूवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे.

  • स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. त्यानंतर, १६ श्रृंगारांचा साज करावा.

  • त्यानंतर, वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे. त्यासाठी, ताटात फुले, कापसाची पोत, अक्षता, हळदी-कुंकू, उदबत्ती, पांढरा दोऱ्याचा रीळ, मिठाई, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी फळे ठेवावी.

  • ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे. शक्यतो आंबा ताटात ठेवावा.

  • शुद्ध पाण्याचा गडवा (तांब्या) आणि निरांजन सोबत ठेवावे.

  • सुरूवातीला वडाच्या झाडाला पाणी घाला. त्यानंतर, हळदी-कुंकू, अक्षता, फुले कापसाची पोत वाहावी. त्यानंतर, झाडाचे औक्षण करावे.

  • त्यानंतर, पांढरा दोरा वडाला बांधून ७ वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी.

  • पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी, त्यानंतर, विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशिर्वाद घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT