Vat Savitri Purnima Upay : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचं व्रत करते. काही खास उपाय घरात आनंद घेऊन येतील. लक्ष्मीनारायणाच्या जोडी बरोबरच इच्छित पती, दीर्घायुष्य मिळावे म्हणून शंकर पार्वतीचीही उपासना केली जाते. तिच उपासना या वटपौर्णिमेच्या व्रतानिमित्त केल्याने पती पत्नीच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येते असं तज्ज्ञ सांगतात.
त्यामुळे पारंपरिक वट सावित्री पौर्णिमेच्या पूजाविधी बरोबर हे काही खास उपाय करणे योग्य ठरेल.
काय उपाय करावे?
वट पौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुहासिनीचे वाण, सर्व श्रृंगार अर्पण करावा. यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद नांदतो, असं मानलं जातं.
ज्यांचं लग्न जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि पार्वती यांच्या मंत्रांचा जप करावा. यामुळे लवकर विवाह होईल.
वैवाहिक जीवनात तणाव असेल तर पती, पत्नीने शंकर पार्वती मंदीरात जाऊन ११ परिक्रमा माराव्या ताण दूर होण्यास मदत होईल.
वट पौर्णिमेला शिव मंदिरात बसून पती-पत्नीने मंगलस्तत्राचं पठण केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील.
या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे तुमच्या विवाहित आयुष्यातही माधुर्य येईल.
या दिवशी शंकर पार्वतीला पांढरे फुल नक्की चढवा. यामुळे विवाहित आयुष्यात शांती राहते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.