Weekly Horoscope esakal
संस्कृती

Weekly Horoscope : या आठवड्यात तुमच्या राशीत काय योग आहे, वाचा आठवड्याचे संपूर्ण राशीभविष्य

९ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या आठवड्यात तुमच्या राशीत काय योग आहे ते जाणून घेऊया

गौरव देशपांडे

Weekly Horoscope : पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या आठवड्यात तुमच्या राशीत काय योग आहे ते जाणून घेऊया.

मेष - पारिवारिक जीवनात या आठवड्यात तुम्हाला मिश्रित फळे प्राप्त होतील. वैवाहिक जीवनात अनेक तणाव आणि अनेक आव्हाने येतील. आपण जे जे काम कराल त्यामध्ये आपण यशस्वी व्हाल आणि कोणताही विषय सहजपणे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. अनुकूल ग्रहांच्या हालचालींमुळे घरात मांगलिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. नोकरी बदलायची इच्छा असल्यास या आठवड्यात प्रयत्न केल्यास यश मिळेल.

वृषभ - प्रेम, आरोग्य, कुटुंब, व्यवसाय, पैसे आणि शिक्षण यासंबंधीचे निर्णय सावधपणे घ्या, अन्यथा कालांतराने तुम्हाला दोषांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नाही व शत्रुत्व वाढणार नाही याची विशेष काळजी या आठवड्यात घ्यावी लागेल. परेदशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना हा काळ चांगला आहे. तुमच्या आरोग्याला आपायकारक असणाऱ्या सगळ्या गोष्टी टाळा. व्यापाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल.

मिथुन - कुटुंबात शांतता आणि समृद्धी कायम राहील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील. ज्यांना घशाचा त्रास आहे आणि ज्यांना त्वचेची समस्या आहे त्यांना या काळात खबरदारी घ्यावी. या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायात प्रगती कराल. पदोन्नती किंवा नोकरीत बदलाच्या संधी मिळतील. पैसा येईल पण खर्चही जास्त होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल.

कर्क - अनुकूलतेचे आणि प्रगतीचे वारे वाहणार आहेत. ग्रहांचे पाठबळ परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल. आजार आणि शत्रुचे भय नसेल. या आठवड्यात आर्थिक लाभ होऊन जाईल. त्यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही. घरात उत्साहाचे वातावरण राहील. काही गौप्यस्फोट झाल्याने मन विचलीत होईल. या आठवड्यात जमीन खरेदीस अनुकूल काळ आहे. मात्र दस्तऐवज काळजीपूर्वक वाचून चौकशी करून घ्यावी.

सिंह - तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काही करण्याची इच्छा मनात बाळगली असेल तर तुमच्या प्रयत्नांना निश्चित यश मिळणार आहे. खूप दिवसांपासून एखाद्या आजाराचा सामना करत असाल तर ह्या आठवड्यात त्यामध्ये बर्याच प्रमाणात सुधारणा झाल्याचे जाणवेल. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि तुम्हाला बदल हवा असेल तर काही अधिक चांगले मिळविण्यासाठी हा योग्य काळ आहे. त्यामुळे एखादी नवीन संधी चालून आली तर अजिबात सोडू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. अचूक नियोजनामुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर मात कराल.

कन्या - तुमच्या प्रकृतीमध्ये उतार चढाव दिसून येतील. याचा अर्थ तुम्ही आजारी पडालच असे नाही. फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ असेल. तुमच्या आप्तेष्टांच्या वागणुकीचा तुम्हाला त्रास होऊ शकेल, पण तुलनेने आठवड्याचा उत्तरार्ध अधिक चांगला दिसून येत आहे. या काळात तुम्हाला कोणी काही बोलले तरी फार मनावर घेऊ नका. आर्थिक स्थिती समाधान कारक राहील व तुम्हाला सगळीकडूनच सहकार्याचा हात मिळेल.

तूळ - या आठवड्याची सुरुवात उर्जेनी आणि निर्धारांनी भरलेली असेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात स्वारस्य निर्माण होईल आणि तुम्ही कदाचित तीर्थयात्रेसाठी किंवा गुरु दर्शनासाठी जाऊ शकाल. तुमच्या घरात प्रकृतीबाबत कुरबुरी सुरू राहतील. तुमच्या कष्टांमुळे तुम्ही प्रगतीपथावर जाऊ लागाल. पण, तुम्ही आळशीपणा टाळला पाहिजे. वैवाहिक सुख वाढेल. गरोदर महिलांनी या आठवड्यात प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. व्यावसायिकांना व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल झालेले दिसून येतील.

वृश्चिक - तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ कार्यक्षेत्रात भरपूर यश प्रदान करेल यामुळे करिअर मध्ये तुम्ही सदैव पुढे जाताना दिसाल. आतापर्यंत नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते. खर्चामध्ये अचानक वाढ होईल व धन हानि होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण आपली संपत्ती साठवण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पालकांच्या खराब आरोग्यामध्ये सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य राहील. प्रेमजीवनात हा आठवडा उत्तम राहील.

धनु - या आठवड्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. धनु राशीच्या महिलांनी वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. कौटुंबिक जीवनात संमिश्र परिणाम मिळतील. कामातील अती व्यस्ततेमुळे कुटुंबातील सदस्यांना वेळ देणे कठीण होऊन गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करत राहा, काही अडचण असल्यास संवादातून तोडगा काढा.

मकर - कुटुंबात काही शुभ कार्य होऊ शकते आणि त्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहभागी होऊ शकता. आपल्या जोडीदाराशी सुसंवाद साधावा अन्यथा वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. संततीकडून सुखद परिणाम मिळू शकतात. नोकरी व्यवसायात स्थिरता राहिल. कौटुंबिक सदस्यांच्या वागणुकीचा तुम्हाला त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. अशा वेळी तुमच्या आहाराच्या सवयींवर लक्ष ठेवणे आवश्यक राहील. वेळेचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास प्रगती होईल.

कुंभ - तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन कार किंवा घर घ्यायचे असल्यास थोडेसे प्रयत्न करा; तुमची इच्छा पूर्ण होईल. ज्या दांपत्यांना अपत्य हवे आहे त्यांनी या कालावधीत प्रयत्न केल्यास अपत्यप्राप्ती होईल. उद्योजक त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवतील. आर्थिक वृद्धीसाठी हा सुयोग्य काळ आहे. असे असले तरी तुमच्या कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघाडीवर तुम्हाला अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पोटाच्या व पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहारविहाराची काळजी घ्यावी. (Weekly Horoscope)

मीन - तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील. तुमची काहीशी फटकळ भाषा हे त्यासाठीचे एक कारण असू शकेल. त्यामुळे शक्य तिथे विनम्रपणे वागा. नव्या संधी मिळतील. कामाच्या स्वरूपात बदल होण्याच्या शक्यता आहेत. अधिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. त्या नेटाने पूर्ण करणे हे मात्र आपल्यावर अवलंबून राहील. मुलाबाळांच्या उत्कर्षाच्या वार्ता समजतील. कामानिमित्त प्रवास कराल. प्रवास अनपेक्षित लाभ देणारे असतील. वातावरणातील बदलांमुळे त्वचेचा व श्वसनाचा त्रास संभवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT