shanidev sakal
संस्कृती

Shani Jayanti 2022: शनिदेवाच्या प्रकोपाला लोक का घाबरतात? जाणून घ्या कारण

शनिदेव ज्या व्यक्तीवर कोपले असेल त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती, मान-सन्मान, व्यवसाय नष्ट करतात.

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्त्रामध्ये शनि ग्रहाला पाप ग्रह म्हटले गेले आहे. सार्वजनिक जीवनामध्ये मनुष्य शनि महाराजांना इतका घाबरतो, की अगदी साधी ठेचही लागली तरी वेदनेने विव्हळत असतांना 'काय शनि लागलाय माझ्या मागे' असे शब्द तोंडातून आपसूकच बाहेर पडतात. काहीही वाईट घडले की त्याचे खापर शनि महाराजांवर आपण फोडत असतो.

वास्तविक पाहता इतर ग्रह जसे अनुकूल परिस्थितीत शुभ फळ देतात व प्रतिकूल परिस्थितीत अशुभ फळ देतात, शनि महाराजही अगदी याच प्रकारे फळ देत असतात. शनि पाप ग्रह असला तरी तो नकारात्मक झाल्यावरच समस्या उत्पन्न करीत असतो. (why people fear shani and its curse)

शनी ग्रहाचे सुर्यप्रदक्षिणेला ३० वर्षाचा कालावधी लागतो.आपले पृथ्वीवरून ३६० अंशात दिसणारे अवकाशातील तारामंडल एकुण १२ राशीत ( पुंजक्यात) विभागले आहे.अर्थात एका राशीत शनी ग्रह सुर्यप्रदक्षिणा करीत असतांना दोन किंवा अडीच वर्षाचा कालावधी लागतो. एका राशीत शनी असतांना क्रमानुसार आधीचे राशीवरील आणि नंतर येणाऱ्या राशीवर त्याचा ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रभाव असतो असे मानले जाते म्हणजे एकुण (३०वर्षात )साडे सात वर्षे प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव असतो.

आता शनी व मंगळ हे दोन्ही पापग्रह समजले जातात. त्यांचे काम बुध्दी भ्रमीष्ट करणे, आपत्ती निर्माण करणे, कार्यात अडथळे आणणे, स्वास्थ हानी, आर्थिक नुकसानी, रोग, दारिद्र, शारीरिक, मानसिक त्रास इत्यादि प्रकारे दुख: देणे असे शास्त्रात सांगितले आहे.

आहार, निद्रा, काम व भय हे चार प्रत्येक सजीवाचे लक्षणे आहेत. जीव जेव्हा मोलाचा वाटतो तेव्हा भय लक्षणाचा उपयोगच होतो. अशात संस्काराचा भीतीयुक्त पगडा मनांत आधीच असेल तर वरील प्रमाणे एखाद्या लहानशा मनाविरूध्द घडलेल्या घटनेचा संबंध भाग्याशी लावला जातो.

कलियुगात शनि हा सर्वात प्रबळ ग्रह मानला जातो. शनिदेवाच्या प्रकोपामुळे केवळ मानवच नाही तर देवताही घाबरतात. ज्यावर शनिची वाईट नजर पडते, त्याला जीवनातील सर्व संकटांचा सामना करावा लागतो. भगवान शंकर स्वतः शनिच्या कोपापासून वाचू शकले नाहीत. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न ठेवणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार शनि अशुभ असेल तर या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी लवकर काही उपाय करावेत. शनिदेव ज्या व्यक्तीवर कोपले असेल त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती, मान-सन्मान, व्यवसाय नष्ट करतात. शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करणाऱ्या व्यक्तीला सर्वत्र अपयशच मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT