बंगळुरू - कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू टी खादेर यांनी बुधवारी भाजपच्या १० आमदारांना शिस्तभंग केल्याबद्दल निलंबित केले आहे. आमदारांनी सभागृहात मंजूर केलेल्या विधेयकांच्या प्रती फाडून उपसभापती रुद्रप्पा लमाणी यांच्यावर फेकल्या होत्या.
आर. अशोक, डॉ. सीएन अश्वथ नारायण, अराग ज्ञानेंद्र आणि व्ही सुनील कुमार या चार माजी मंत्र्यांसह निलंबित आमदारांना मार्शलने हटवल्याने राज्य विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. आमदारांना 21 जुलै अर्थात अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये अरविंद बेलाड, भरत शेट्टी, यशपाल सुवर्णा, उमानाथ कोट्यान, वेदव्यास कामथ आणि धीरज मुनिराजू या आमदारांचा समावेश आहे.
मंगळवारी शहरात झालेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा भाजपने निषेध केला. यावेळी भाजपच्या आमदारांकडून लमाणी यांच्यावर कागदपत्रे फेकण्यात आली.
दरम्यान दुसऱ्या सत्रात सभागृह बोलवताच खादेर यांनी आमदारांवर कारवाईची घोषणा केली. त्यानंतर कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी आमदारांना २१ जुलैपर्यंत अर्थात अधिवेशन संपेपर्यंत निलंबीत करण्याची कारवाई केली.
निलंबनानंतरही भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्येच होते. त्यानंतर आमदारांना हटवण्यासाठी मार्शल वेलमध्ये उतरताच उपस्थित भाजप आमदारांच्या गटाने विरोध केला. त्यामुळे निलंबित मदारांना हटवणे अवघड झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.