Jammu & Kashmir Terrorist Attack Esakal
देश

Terrorist Attack: 5-6 गोळ्या चालवायचे थांबायचे अन् पुन्हा...; जम्मू बस अटॅकमध्ये जखमींनी सांगितली आपबिती

Jammu & Kashmir Terrorist Attack: जम्मूच्या रियासीमध्ये बसवर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने सांगितले काय घडलं याबाबत सांगितलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी प्रथम बसवर अंदाधुंद गोळीबार केला, त्यामुळे बस चालविणाऱ्या चालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस खड्ड्यात पडली. या हल्ल्यात 30 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना बसवर दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले बलरामपूर, यूपीचे रहिवासी संतोष कुमार वर्मा यांनी सांगितले की, शिवखोडीला भेट दिल्यानंतर आम्ही कटराकडे जात होतो. बस वरून खाली येत असताना एका दहशतवाद्याने रस्त्याच्या मधोमध गोळीबार सुरू केला. चालकाला गोळी लागल्याने बस खड्ड्यात गेली. दहशतवाद्यांनी सुमारे 20 मिनिटे गोळीबार केला. गोळीबार थांबल्यानंतर पोलीस आले आणि समोरून दहशतवादी गोळीबार करताना पाहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. बाकीचे इकडून तिकडे गोळीबार करत होते. 5-6 वेळा गोळीबार केल्यानंतर ते थांबायचे आणि पाच मिनिटांनी पुन्हा गोळीबार सुरू करायचे.

यूपीच्या गोंडा येथील रहिवासी नीलम गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही शिवखोडीला भेट दिल्यानंतर येत होतो. दहशतवाद्यांनी तिथे गोळीबार केला, गोळी बसचालकाला लागली आणि त्यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली. मात्र, तेथे किती दहशतवादी होते याची माहिती त्यांच्याकडे नाही. ते म्हणाले, "बस खंदकाखाली आली तेव्हा आम्हाला दहशतवाद्यांना दिसत नव्हते. बसमध्ये लहान मुलांसह 40 लोक होते. अनेक जण जखमी झाले होते. त्यांचं संपुर्ण कुंटुंब बसमध्ये प्रवास करत होतं.

नीलम गुप्ता यांचा मुलगा पल्लव याने सांगितले की, आम्ही बसमध्ये होतो आणि कोणी गोळीबार केला हे आम्हाला माहित नाही. आवाज कमी झाल्यावर आम्ही सगळे बसमधून खाली उतरलो. काही वेळ गोळ्या लागल्या नाहीत, आम्ही खड्ड्यात पडलो होतो. मला माझ्या बाबांनी मला बाहेर काढले.

एका यात्रेकरूने सांगितले की, तेथे 6-7 दहशतवादी होते, त्यांचे चेहरे झाकलेले होते. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर बसला घेरले आणि गोळीबार केला, बस खाली खड्ड्यात पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची खात्री करण्यासाठी गोळीबार करत राहिले. आम्ही शांत राहीलो.

अमित शाह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

त्याचवेळी केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, यात्रेकरूंवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. रविवारी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच शाह म्हणाले की त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन यांच्याशी चर्चा केली आणि दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

काँग्रेससह या पक्षांनी हल्ल्याचा केला निषेध

ही घटना जम्मू-काश्मीरमधील चिंताजनक सुरक्षेच्या परिस्थितीचे खरे चित्र दर्शवते, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे एनडीए सरकार शपथ घेत असताना आणि अनेक यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात लोकांना आपला जीव गमवावा लागला.नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) फारुख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबुबा मुफ्ती आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (DPAP) गुलाम नबी आझाद, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

मृतांची ओळख पटू शकली नाही

रियासी एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले की एक दुर्दैवी घटना घडली आणि प्राथमिक अहवालानुसार, दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला आणि गोळीबार केला. बस कटरा येथून शिव खोडीकडे निघाली होती गोळीबार झाला आणि बस खड्ड्यात पडली. बचाव कार्य पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे सर्वजण उत्तर प्रदेशातील असल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. शर्मा यांनी पुढे सांगितले की, ते सहसा हाय अलर्टवर असतात आणि गेल्या अनेक दिवसांपासून आसपासच्या भागात सतत गस्त ठेवून शिव खोडी मंदिर पूर्णपणे सुरक्षित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT