नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या असून प्रचाराला वेग येईल. देशात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये लढत होईल. इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा दिलेला नाही. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत १० बड्या चेहऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे. ते १० दहा चेहरे कोण हे आपण पाहुया..(Narendra Modi Rahul Gandhi 10 leaders of the country who will be important in the Lok Sabha elections 2024)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींचा करिष्मा अद्याप कायम आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. पण, निकालानंतर एनडीएला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मोदी सरकारमधील अघोषित दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये चाणक्य देखील म्हटलं जातं. अमित शाह यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शाह यांनी अनुच्छेद ३७० हटवणे, सीएए लागू करणे असे महत्त्वाचे निर्णय घेतलेत. मोदी सरकारमधील जनरल म्हणून ते काम करत आहेत. ५९ वर्षीय शाह हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसला वारंवार पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण, गेल्या काही काळात राहुल गांधी अधिक सक्षम म्हणून पुढे आले आहेत. राहुल गांधी पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी प्रचार केला. ५३ वर्षीय राहुल गांधी हे काँग्रेसची बाजू जोरकसपणे मांडत आहे. त्यांच्या नेतृत्त्वाचा काँग्रेसला किती लाभ होतो हे पाहावं लागेल.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकमधून राज्यसभेचे खासदार आहेत. ८१ वर्षीय खरगे यांच्यासमोर अनेक आव्हाणं आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी पक्षाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी सर्व पक्षांसोबत चांगलं जुळवून घेतलं आहे. एक दलित चेहरा म्हणून त्यांच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबत जातील अशी शक्यता होती. पण, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ६९ वर्षीय बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमधील प्रभाव निर्विवाद आहे. भाजपला जशासतसे उत्तर देण्यात ममता बॅनर्जी सक्षम आहेत.
बिहारमध्ये सत्ता कामय ठेवण्यात नितीश कुमार कायम यशस्वी होतात. नितीश कुमारांनी आवश्यकतेनुसार पक्षांसोबत युती-आघाडी केली आहे. ७३ वर्षीय नितीश कुमार यांच्या एनडीएसोबत जाण्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. नेहमी यू-टर्न घेणारे नितीश कुमार यांना बिहारची जनता किती सहन करते हे येत्या काळात पाहायला मिळेल.
८३ वर्षीय शरद पवार यांना त्यांचे पुतणे अजित पवार यांनी धक्का दिला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे आहे. पण, शरद पवारांनी पराभव स्वीकारलेला नाही. राज्यात महायुतीला ते जोरदार टक्कर देण्याच्या क्षमतेचे नेते आहेत. आपल्या राजकीय चातुर्याबाबत पवार ओळखले जातात. त्यामुळेच मविआकडून काही आश्चर्यकारक कामगिरी पाहायला मिळू शकते.
डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी तमिळनाडूमध्ये स्वत:ला स्थापित केलं आहे. भाजपला ते राज्यात जोरदार विरोध करत आहेत. डीएमकेने डावे आणि काँग्रेससोबत मिळून लढण्याचं ठरवलं आहे. ७१ वर्षीय स्टॅलिन गांधी कुटुंबाचे कट्टर समर्थक आहेत. पण, त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण करण्यात आला आहे. भाजपने याला चांगला राजकीय मुद्दा बनवला आहे.
आरजेडी नेता आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचे राज्यात महत्त्व वाढलं आहे. नितीश कुमार यांनी साथ सोडल्याने त्यांची इंडिया आघाडीतील जागा महत्त्वाची बनली आहे. ३४ वर्षीय तेजस्वी यांचा जमिनीस्तरावर चांगला संपर्क आहे. लालू प्रसाद यादव यांचे सक्षम उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत.
ऑल इंडिया मसजिल-ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन औवेसी हे मुस्लिमांचे नेतृत्व करणारे एक प्रबळ नेता आहेत. विरोधकांना उत्तर देताना ते कधीही मुद्द्यावरुन हटत नाहीत. ५४ वर्षीय ओवैसींनी लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभे केले आहेत. ते निवडणुकीत काय कमाल दाखवतात हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.