Telugu actress Hema esakal
देश

'या' अभिनेत्रीसह 101 सेलिब्रिटींचा रेव्ह पार्टीत सहभाग; कारवाई करत पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

सकाळ डिजिटल टीम

शहराच्या बाहेरील एका फार्म हाऊसमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीचे प्रकरण हेब्बागोडी पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले असून, या पार्टीत १०१ जणांचा सहभाग होता.

बंगळूर : गेल्या रविवारच्या मध्यरात्री बंगळूर येथील इलेक्ट्रॉनिक सिटी येथील जीआर फोरम हाऊसमध्ये आयोजित रेव्ह पार्टीमध्ये तेलगू चित्रपट अभिनेत्री हेमासह (Telugu film actress Hema) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अभिनेत्री हेमाने आधी पार्टीत नव्हते, मी हैदराबादच्या फार्म हाऊसवर होते, असा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर काल अभिनेत्री हेमाने घरी स्वयंपाक करतानाचा व्हिडिओ शेअर केला; पण ते खोटे असून, ती जीआर फार्म हाऊसवर राहत असल्याचे शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद (Commissioner of Police B. Dayanand) यांनी स्पष्ट केले.

दयानंद यांनी पत्रकार परिषद घेऊन रेव्ह पार्टीवर झालेल्या सीसीबी पोलिसांच्या छाप्याची सविस्तर माहिती दिली. तेलगू अभिनेत्री हेमाने रेव्ह पार्टीत (Rave Party) भाग घेतला हे खरे आहे. तिने फार्म हाऊसमध्ये व्हिडिओ बनवला आणि निवेदन जारी केले. त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या हेमाच्या रक्ताचे नमुने घेऊन पाठवण्यात आले आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर हेमाची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे दयानंद यांनी सांगितले.

शहराच्या बाहेरील एका फार्म हाऊसमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीचे प्रकरण हेब्बागोडी पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले असून, या पार्टीत १०१ जणांचा सहभाग होता. त्यात लोकप्रतिनिधी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फार्म हाऊसवरील ‘सनसेट टू सनराईज व्हिक्ट्री इव्हेंट’मध्ये राज्याबाहेरील लोकांसह काही स्थानिक बेकायदेशीर कामात सामील असल्याच्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. सीसीबी पोलिसांच्या छाप्यात अमली पदार्थ सापडले. काहींनी ती वापरत असलेली औषधे स्विमिंग पूलमध्ये फेकून दिली. या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कारवाईत श्वानपथकाचा वापर

या कारवाईत श्वानपथकाचा वापर करण्यात आल्याने ही कारवाई यशस्वी झाली. मोटारीतून काही लोक अमली पदार्थ घेऊन आले होते. श्वानपथकाला वेगवेगळ्या ठिकाणी अमली पदार्थ लपवून ठेवलेले आढळून आले. २०२३ मध्ये श्वानपथकाला यासाठी शोधण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचा अशा मोहिमेसाठी आम्ही प्रथमच यशस्वीपणे वापर केल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT