SSC Exam Study Tips : आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्याआधी ही काळजी घेणे आवश्यक आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असतो त्यांच्या दहावीचा निकाल.
परीक्षेच्या दडपणाखाली भितीने केलेला अभ्यास विसरू नये किंवा परीक्षेच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ही काळजी घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया सविस्तर.
शिक्षण तज्ज्ञ म्हणतात, विद्यार्थ्यांनी परीक्षेचा कुठलाही ताण न घेता सकारात्मक विचाराने आत्मविश्वासाने सामोरे जावे. परीक्षा केंद्रात गेल्यावर प्रश्नपत्रिका नीट समजून घ्यावी.
मुद्देसूद आणि चांगल्या हस्ताक्षरात प्रश्नांची उत्तरे लिहावीत. प्रश्न किती गुणांचा आहे यावर तुमच्या उत्तराचा आशय अवलंबून असावा. असे केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ पुरतो.
न झालेल्या अभ्यासाचे टेंशन घेण्याऐवजी केलेल्या अभ्यासाची पेपरच्या आदल्या दिवशी योग्य उजळणी करावी.जेणेकरुन तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या आधारावर तुम्हाला व्यवस्थित उत्तरे सोडवता येईल.
परीक्षेला जाताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा
पेपरला जाताना उपाशीपोटी जाऊ नये.
वाहतूक कोंडी शक्यता गृहीत धरून घरातून लवकर निघावे.
हॉल तिकीट सोबत ठेवावे.
एकाच रंगाचे दोन काळे आणि दोन निळे पेन आणि कंपासात इतर महत्वाच्या गोष्टी सोबत ठेवाव्यात.
पाण्याची बाटली, घड्याळ जवळ असावी.
पुरवणी दोऱ्याने बांधावी, स्टेपलरचा वापर करु नये.
लिखित स्वरुपातील कोणतेही साहित्या जवळ ठेवू नये.
प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये.
परीक्षा केंद्रात डिजीटल उपकरणे घेऊन जाऊ नये.
सुंदर हस्ताक्षरात उत्तरे लिहावी.
शब्दावर रेष असावी. दोन शब्दात पुरेसे अंतर असावे.
पेपर सोडवताना ही काळजी घ्या
प्रश्नपत्रिका शांतपणे वाचावी व सूचना बारकाईने पहाव्यात.
प्रश्नपत्रिकेमध्ये चूक असल्यास पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून द्यावी.
नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे.
एखाद्या प्रश्नात उपप्रश्न असतील तर ते एका पानावर सोडवले तरी चालतात.
शक्यतो सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून काढावीत.
कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे ठरवून द्यावे.
पेपर सोडवून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून पाहावा.
योग्य तिथे आकृत्या, टेबल पेन्सिलने काढावे, त्यांना नावे द्यावीत.
काही चुकल्यास खाडाखोड न करता एक रेष काट मारावी. (Exam)
परीक्षेच्या काळात हेही करा
पचनासाठी हलका आहार घ्या. पुरेशी झोप घ्या.
जेवणानंतर शतपावली करु अभ्यासाला बसावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
मानसिक स्वास्थ्य मजबूत राहाण्यासाठी दररोज दहा ते पंधरा मिनिटे ध्यान, श्लोक पठण करावे. योगासन, थोडा वेळ चालणे यातून उर्जा मिळते.
सकारात्मक विचार करा, आत्मविश्वासाने बाहेर पडा.
पालकांनी मुलांना अभ्यासात मदत करावी. मुलांना वेळ द्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.