सध्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म्सवरती अनेक ट्रेंड पाहायला मिळतात. एखाजी गोष्ट 'हिट' झाली की सगळेच जण ती करू लागतात. यामध्ये डान्स स्टेप कॉपी करण्यासोबतच एखाद्या कृतीचा देखील समावेश असतो. प्रत्येकाला व्हायरल कन्टेंट बनवायचा असल्याने बरेच जण डोळे झाकून कोणाचेही अनुकरण करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला असून यामुळे एका ११ वर्षीय मुलाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत.
सोशल मीडियावर पाहिलेल्या प्रँकची नक्कल करताना या अकरा वर्षीय मुलाल जीव गमवावा लागला आहे. हा प्रकरा उत्तर प्रदेशमधील हामीपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दोराच्या टोकाला बांधण्यात आलेल्या फासासोबत तो खेळत होता. तो दुसरीकडून दोराचे टोक ओढताच आवळला जाणारा गोलाकार फास लावला होता. गुदमरुन त्या मुलाचा मृत्यू झाला .
पीडित मुलाचा साथीदार राजूने रुममधील छताच्या हूकला टॉवेल अडकवला होता. पण प्रँक फसल्यानंतर त्याला सोडून खाली काढेपर्यंत अनर्थ झाला. पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलाने हा 'प्रँक' सोशल मीडियावर पाहिला होता. पोलिसांना नंतर त्यांच्या फोनमधील वॉचलीस्टमध्ये तो संबंधीत व्हिडीओ देखील आढळून आला. त्यांनी सांगितलं की मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर लगेच मोबाईलवर रील्स बघायला सुरूवात केली होती.
त्याने रिल पाहूण त्या प्रँकची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण फास त्याच्या गळ्याभोवती आवळत गेला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पीडित मुलचे वडिल अवधेश यांना तीन मुलं असून मृत निखील सोडून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
हामीरपूरच्या एसपी दिक्षा शर्मा यांनी सांगितले की मोबाईल तपासला असता त्या जीवघेण्या प्रँकचा व्हिडीओ युट्यूबच्या वॉचलिस्टमध्ये सापडला.
आम्ही सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मुलांच्या हलचालींकडे बारकाईने लक्ष ठेवावे, जेणेकरून ते काही वाईट पाहाणार नाहीत असेही शर्मा म्हणाल्या. दरम्यान निखील शिकत असलेल्या शाळेच्या संचालकांनी सांगितल की निखील हा अभ्यासात हुशार विद्यार्थी होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.