1132 personnel of Police Fire Service Home Guard Civil Defense and Correctional Service awarded Gallantry and Service Medals ahead of Republic Day  
देश

Gallantry Award 2024 : महाराष्ट्रातील 18 जवानांसह 277 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड आणि सिव्हील डिफेंस आणि करेक्शनल सर्व्हिसेस यांच्या एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत

रोहित कणसे

प्रजासत्ताक दिन हा काही तासांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड आणि सिव्हील डिफेंस आणि करेक्शनल सर्व्हिसेस यांच्या एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. याबद्दलची माहिती केंद्रिय गृह मंत्रालय कार्यलयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती शौर्य पदक (PMG) दोन जणांना आणि शौर्य पदक (GM) 275 जवानांना देण्यात आले आहेत. (Gallantry and Service Medals 2024)

277 शौर्य पुरस्कारांपैकी नक्षल प्रभावीत भागातील 119 जवान, जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील 133 जवान आणि इतर क्षेत्रांतील 25 जवानांना त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

277 शौर्य पदकांपैकी 275 शौर्य पदके - ही जम्मू-काश्मीर पोलिसांच्या 72 जवानांना, महाराष्ट्रातील 18 जवान, छत्तीसगडमधील 26 जवान, झारखंडमधील 23 जवान, ओडिशातील 15 जवान, दिल्लीतील 8 जवान, सीआरपीएफचे 65 जवान तसेच इतर 21 जवान हे SSB आणि इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील आहेत.

विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणारे 102 राष्ट्रपती शौर्य पदकांपैकी 94 पोलीस सेवेसाठी, 4 अग्निशमन सेवेसाठी आणि 4 सिव्हील डिफेन्स आणि होमगार्ड सर्व्हिसेससाठी देण्यात आले आहेत.

मेरिटोरियस सर्व्हिस (MSM) च्या 753 पदकांपैकी 667 पदके पोलीस सेवेसाठी, 32 अग्निशमन सेवेसाठी, 27 सिव्हील डिफेंन्स आणि होमगार्ड सेवेसाठी आणि 27 करेक्शनल सर्व्हिसेससाठी देण्यात आली आहेत.

तर सीमा सुरक्षा दलाचे दोन हेड कॉन्स्टेबल - दिवंगत सानवाला राम विश्नोई आणि दिवंगत शिशुपाल सिंह - यांची या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकासाठी (PMG) मरणोत्तर निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT