राज्यसभा  Sakal
देश

Rajya Sabha Billionaires MP: राज्यसभेत १२ टक्के खासदार अब्जाधीश; 'या' राज्यातील खासदारांचं प्रमाण सर्वाधिक

तसेच कुठल्या राज्यातील किती खासदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत याचाही तपशील समोर आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमेक्रेटिक रिफॉर्म (ADR) या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार राज्यसभेत १२ टक्के खासदार हे अब्जाधीश आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील या खासदारांच्या गुन्हेगारी, आर्थिक आणि इतर बाबींची माहिती या संस्थेच्या अहवालातून समोर आलं आहे. (12 percent of sitting MPs of Rajya Sabha billionaires highest percentage from Andhra Telangana)

सर्व्हेतून समोर आली महत्वाची माहिती

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) या दोन्ही संस्थांनी एकत्रितपणे गोळा केलेल्या माहितीच्या विश्लेषणातून महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये राज्यसभेतील २३३ खासदारांपैकी २२५ खासदारांच्या गुन्हेगारी, आर्थिक आणि इतर पार्श्वभूमीची माहिती घेण्यात आली.

राज्यसभेत सध्या एक जागा रिक्त आहे. यामध्ये आंध्र प्रदेशातून ११ खासदार आहेत त्यापैकी ४५ टक्के अर्थात ५ खासदार, तेलंगाणातील ७ खासदारांपैकी ४३ टक्के अर्थात ३ खासदार, महाराष्ट्रातील १९ खासदारांपैकी १६ टक्के अर्थात ३ खासदार, दिल्लीतील ३ खासदारांपैकी ३३ टक्के अर्थात एक खासदार, पंजाबमधील ७ पैकी २ खासदार, हरयाणातील ५ पैकी १ खासदार आणि मध्य प्रदेशातील ११ खासदारांपैकी २ खासदारांनी आपली संपत्ती जाहीर केली आह. संपत्ती जाहीर केलेल्या या खासदारांकडं १०० कोटींहून अधिक मालमत्ता आहे.

'या' राज्यांमध्ये सर्वाधिक अब्जाधीश खासदार

यांपैकी तेलंगणातील ७ खासदारांची एकूण संपत्ती ही ५,५९६ कोटी रुपये आहे. तर आंध्र प्रदेशातील ११ खासदारांकडं एकूण ३,८२३ कोटी रुपये संपत्ती आहे. तर उत्तर प्रदेशातील ३० खासदारांकडं एकूण १,९४१ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

'इतक्या' खासदारांवर गंभीर गुन्हे

राज्यसभेतील २२५ खासदारांपैकी ३३ टक्के खासदारांवर अर्थात ७५ खासदारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहेत. तर १८ टक्के अर्थात ४१ खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दोन खासदारांवर खुनाचे खटले दाखल आहेत. ४ खासदारांवर महिलांसंदर्भातील गुन्हे दाखल आहेत. तर एका खासदारावर बलात्काराचा खटला दाखल आहे.

कुठल्या पक्षांच्या खासदारांवर किती गुन्हे?

भाजपच्या ८५ पैकी २३ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. तर काँग्रेसच्या ३० पैकी १२ खासदारांवर, तृणमूलच्या १३ खासदारांपैकी ४ खासदारांवर, राजदच्या ६ पैकी ५ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. तसेच सीपीआयच्या ५ पैकी ४ खासदारांवर, आपच्या १० पैकी ३ खासदारांवर, वायएसआर काँग्रेसच्या ९ पैकी ३ खासदारांवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ पैकी २ खासदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT