Online Job Crime esakal
देश

ऑनलाईन नोकरीचं आमीष, तरुणांना सहा कोटींचा गंडा; महाराष्ट्र, कर्नाटकासह 21 राज्यांत 122 गुन्हे दाखल

Online Jobs : याप्रकरणी उत्तर विभागाचे डीसीपी सैदुलू अदावत, एसीपी पवन, निरीक्षक शिवरत्न यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

अटक करण्यात आलेल्या १० आरोपींपैकी दोघांचे ४७ बँक पासबुक, ४७ सिमकार्ड, ३१ डेबिट कार्ड, गुन्ह्यात वापरलेले ९ मोबाईल फोन जप्त केले.

बंगळूर : ऑनलाईन नोकरीचे (Online Jobs) आमीष दाखवून सहा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करत उत्तर विभाग सीईएन पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटकसह २१ राज्यांत १२२ एनसीआरपी गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून ७२ मोबाईल फोन, १८२ डेबिट कार्ड, २ लॅपटॉप, १३३ सिमकार्ड, १२७ बँक पासबुक आणि १.७४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे शहर पोलिस (Bangalore Police) आयुक्त बी. दयानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याप्रकरणी सय्यद याय्हा, उमर फारुक, मोहम्मद माहीन, मोहम्मद मुझामिल, तेजेश, चेतन, वसीम, सय्यद जायद, साही अब्दुल अनान आणि ओमप्रकाश अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सात जून रोजी आरोपीने बागलगुंटे येथील टी. दासरहळ्ळी येथील एका व्यक्तीच्या मोबाईलवर व्हॉटस् ॲप मेसेज पाठवून ऑनलाईन नोकरी देतो, असे सांगितले.

नंतर त्याला ऑनलाईन टास्क देऊन आमिष दाखवत त्याच्या खात्यावर अधिक पैसे जमा करून विश्वास निर्माण केला. याशिवाय क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असा विश्वास दाखवून ६ जून ते १ जुलै या कालावधीत २५ लाख ३७ हजार ८१५ रुपयांची रक्कम हस्तांतरित करून फसवणूक केल्याचा गुन्हा उत्तर विभाग सीईएन सायबर क्राईम पोलिस ठाण्यात दाखल झाला. सायबर क्राईम पोलिसांनी ज्या खात्यांद्वारे विविध बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले, त्या खातेदारांची माहिती मिळवली आणि या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या १० पैकी सात जणांना अटक केली. पसार असलेल्या अन्य तिघांच्या माहितीच्या आधारे त्यांना अटक केली. तिघे चीनला गेले होते. त्यांना तेथून परतत असताना पकडले.

अटक करण्यात आलेल्या १० आरोपींपैकी दोघांचे ४७ बँक पासबुक, ४७ सिमकार्ड, ३१ डेबिट कार्ड, गुन्ह्यात वापरलेले ९ मोबाईल फोन जप्त केले. सॅम्पीगेहळ्ळी पीजीमध्ये राहणाऱ्या तीन आरोपींकडे ५२ डेबिट कार्ड, ३४ मोबाईल फोन, ४० सिमकार्ड, १ लॅपटॉप आणि पीजीमध्ये ठेवलेली ३० बँक पासबुक जप्त केली. या प्रकरणातील सर्व आरोपी हे बंगळूर येथील असून, या प्रकरणाप्रमाणेच त्यांच्यावर विविध २१ राज्यांमध्ये एकूण १२२ एनसीआरपी गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी उत्तर विभागाचे डीसीपी सैदुलू अदावत, एसीपी पवन, निरीक्षक शिवरत्न यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT