medical equipment  Sakal
देश

लायसन्सशिवायही 12वी पास व्यक्ती करू शकणार मेडिकल व्यवसाय

केंद्रीय आरोग्य मंत्रालाककडून कॉस्मेटिक अँड ड्रग्ज कायद्यामध्ये बदल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालाककडून कॉस्मेटिक अँड ड्रग्ज कायद्यामध्ये (Cosmetic & Drugs Act) बदल केले आहेत. या बदलामुळे कोणतीही 12वी उत्तीर्ण व्यक्ती या व्यवसायात पाऊल ठेवू शकणार असून, यासाठी एक वर्षाचा अनुभव असण्याची अट आवश्यक असणार आहे. नियमात बदल केल्याने मेडिकलचा व्यापार सोपा होण्याबरोबरच बाजारात आवश्यक असणाऱ्या या गोष्टींची कमतरता भासणार नाही, असे मत प्रिव्हेंटिव्ह वेअर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (PWMAI) अध्यक्ष संजीव रिल्हान यांनी व्यक्त केले आहे. याबाबत झी बिझीनेस हिंदीने वृत्त प्रकाशित केले आहे. (Medical Business Without License )

नव्याने करण्यात आलेल्या बदलामुळे या नियमांतर्गत आता बारावी उत्तीर्ण व्यक्तीही वैद्यकीय व्यवसायाच्या (Medical Businesses ) क्षेत्रातील उपकरणांची खरेदी-विक्री करू शकणार आहे. यापूर्वी मेडिकल व्यवसायासाठी पूर्वी फार्मासिस्ट (Fantasist ) पदवी आवश्यक होती. मात्र आता त्याची गरज भासणार नसून, यासाठी आता परवाना काढण्याचीही गरज भासणार नाहीये. यासाठी केवळ वैद्यकीय उपकरणांच्या विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

वैद्यकीय उपकरणांच्या नियमांमध्ये सुधारणा 2017

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2017 च्या नियमांमध्ये बदल करून परवान्याशिवाय वैद्यकीय उपकरणे खरेदी आणि विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र यासाठी त्यांना 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे. कोविड-19 महामारीच्या (Corona Pandemic) काळात वैद्यकीय उपकरणांचा अभाव पाहण्यास मिळाला होता, त्यामुळे उपचारांशी संबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा फायदा घेत बनावट उपकरणांची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, अनेक छोट्या छोट्या वस्तुंसाठी मनमानी दर आकारण्यात आले होते.

व्यवसायासाठी करावी लागणार नोंदणी

तुम्ही देखील बारावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला देखील या क्षेत्रात व्यावसाय करण्याची इच्छा असल्यास यासाठी तुम्हाला संबंधित राज्याच्या नियामकाकडे नोंदणी करावी लागेल. या नोंदणीनंतर, तुम्ही डायग्नोस्टिक, ऑक्सिमीटर, इन्फ्रा-रेड थर्मामीटर आणि PPE सारख्या गोष्टी विकू शकाल. वैद्यकीय उपकरणांसाठी जगभरातील टॉप-20 बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT