Rahul Gandhi Latest News esakal
देश

कर्नाटकात काँग्रेसला बसणार धक्का? 15 नेते जेडीएसमध्ये सामील होणार; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

रवींद्र देशमुख

रामनगर : आगामी काळात काँग्रेसचे १५ नेते जेडीएसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती जनता दल सेक्युलरचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी दिली. जेडीएसमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेस नेत्यांबाबत ते म्हणाले की, चित्रदुर्गचे माजी विधान परिषद सदस्य रघु अचार यांनी आधीच सांगितलं की, ते स्वत: जेडीएसमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी १५ नेते पक्षात प्रवेश करणार आहेत.

दुसरीकडे, बुधवारी माजी खासदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे निष्कासित नेते एलआर शिवराम यांनी बेंगळुरूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिंकुमार कटील आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. एकीकडे कुमारस्वामी दावा करत आहेत की, काँग्रेसनेते जेडीएसमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या पक्षातच आऊटगोईंग सरू आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराम यांनी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, येत्या 10 दिवसांत आणखी अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. कर्नाटकच्या जनतेला राज्यात डबल इंजिनचे सरकार हवे आहे आणि पक्ष कर्नाटकात बहुमताचे सरकार बनवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला पोहोचले

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT