17 Indian youths who were released from Tripoli Jail in Libya last month returned to India watch video 
देश

Indians Released From Libya : फसवणूक, छळ अन् तुरुंगवास... लिबियात सहा महिन्यांच्या त्रासानंतर १७ तरुण अखेर मायदेशी

रोहित कणसे

इटलीमध्ये नोकरीच्या आशेने भारत सोडून गेलेल्या आणि गेल्या सहा महिन्यांपासून लिबियामध्ये अडकलेल्या १७ भारतीय अखेर मायदेशी परतले आहेत. त्यांची त्रिपोली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अखेर रविवारी ते भारतात परत आले. विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

दिल्ली विमानतळावर पोहचल्यानंतर या तरुणांना त्यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले रविवारी संध्याकाळी उशिरा सर्व जण दिल्ली विमानतळावर पोहोचले.

एक हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार या सर्व भारतीयांच्या सुरक्षित परत आणण्यासाठी राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. सहानी यांनी सांगितले की, हे सर्व तरुण ट्रॅव्हल एजंटच्या जाळ्यात अडकली होती आणि ते बेकायदेशीरपणे इटलीला जात होते. त्याच्या मायदेशी परतण्यासाठी, भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली होती, जी अखेर यशस्वी झाली आहे. बहुतांश तरुण पंजाब आणि हरियाणातील असून ते कामाच्या शोधात असताना ते दलालांच्या तावडीत अडकले होते.

राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी सांगितले की, इटलीला पोहोचण्यापूर्वीच ही मुले लिबियातील माफियाच्या तावडीत अडकली होती . या सर्वांना माफियाने एका इमारतीत ठेवले होते ज्या दरम्यान १७ जणांपैकी एकाने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. साहनी सांगतात की, आमच्या सर्व मुलांना सुरक्षित माफियांच्या तावडीतून बाहेर काढणे ही आमच्यासाठी सर्वात मोठी चिंता होती. स्थानिक पोलिस आणि ट्युनिशियाच्या दूतावासाच्या मदतीने या सर्वांना माफियाच्या तावडीतून सोडवण्यात आलं आणि त्यांना प्रथम त्रिपोली तुरुंगात ठेवण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाने या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. तेव्हा मुले एजंटच्या फसवणुकीला बळी पडली असल्याचे समोर आले. सुमारे ३ महिन्यांपूर्वी त्यांच्यापैकी एकाने आमच्याशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाने ट्युनिशियाच्या दूतावासाशी संपर्क साधला आणि त्यानंतर प्रत्येकाचे पासपोर्ट योग्य प्रकारे बनवले गेले आणि औपचारिकता पूर्ण करता आली. ३० जुलै रोजी या मुलांना त्रिपोली तुरुंगातून सोडण्यात आले आणि त्यांना प्रवाशांसाठी बांधलेल्या बंदरात हलवण्यात आले.

लिबियामध्ये भीषण छळ

लिबिया येथे या १७ मुलांना एका छोट्या खोलीत ठेवण्यात आले होते आणि त्यांना आवश्यक खाण्यापिण्याची सुविधाही देण्यात आली नव्हती. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत शारीरिक अत्याचारही करण्यात आले. पिण्याच्या आणि आंघोळीसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नसलेल्या दयनीय अवस्थेत त्यांना ओलीस ठेवण्यात आले.लिबिया हा युद्धग्रस्त भाग असून या देशात ड्रग्ज, मानवी तस्करी ते अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी असे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT