Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi LoP: लोकसभेचा विरोधी पक्षनेता ठरला! राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब

Leader Of Opposition: काँग्रेसचे संसदीय मंडाळाच्या झालेल्या बैठकीत रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसनेही दहा वर्षांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा लोकसभेला विरोधीपक्षनेता मिळाला आहे.

काँग्रेसचे संसदीय मंडाळाच्या झालेल्या बैठकीत रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. याची माहिती काँग्रेसचे महासचिव केसी वेनुगापाल यांनी दिली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याशिवाय लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनाही याबाबत पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री खरगे यांच्या घरी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, या बैठकीत राहुल गांधी यांना सभागृहात विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची निवड करावी यासाठी हंगामी अध्यक्षांनाही पत्र लिहिले आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक राहुल यांनी वायनाड आणि रायबरेलीतून लढवली होती. यामध्ये राहुल यांनी दोन्ही ठिकाणी विजय मिळवला होता. पण, निवडणूक नियमांनुसार त्यांना एका जागेवरून राजीनामा देणे बंधनकारक होते अशात राहुल यांनी रायबरेलीची जागा कायम ठेवत वायनाडच्या जागेचा राजीनामा दिला.

आता पोटनिवडणुकीत वायनाडमधून राहुल गांधी यांच्या जागी काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जर प्रियंका गांधी जिंकल्या तर सत्ताधाऱ्यांना गांधी भावंडांकडून लोकसभेत चांगलेच आव्हान मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT