भारतात एक वेळ अशी होती, जेव्हा एक लिटर पेट्रोलची किंमत 90 पैसे इतकी असायची.
देशवासियांना लवकरच मोठा दिलासा देण्याच्या तयारीत केंद्र सरकार (Central Government) आहे. इंधन दरवाढीमुळं हैराण झालेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. लवकरच इंधनाचे दर कमी होणार आहेत. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. त्यामुळं पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये, तर डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. तशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी दिलीय. त्यामुळं देशवासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पण.. भारतात एक वेळ अशी होती, जेव्हा एक लिटर पेट्रोलची किंमत 90 पैसे इतकी असायची. यावेळी फुटपाथवर इंधनाचे डिस्पेंसर तर अंगणात इंधनाच्या टाक्या ठेवल्या जात होत्या. आम्ही 1965 सालाबद्दल बोलत आहोत. या काळातील किस्से भारतातील सर्वात जुन्या इंधन केंद्रांपैकी एक असलेल्या जटधारी दाऊ आणि ग्रॅंडसन्सच्या मालकानं सांगितले आहेत.
जटधारी दाऊ आणि ग्रॅंडसन्सच्या (Jatadhari Daw and Grandsons) मालकांपैकी एक असलेल्या कंचन दाऊ (Kanchan Dau) यांनी काही किस्से एका वृत्तपत्राला शेअर केले आहेत. त्यांनी भारतातील इंधनाच्या किमती प्रति लिटर 90 पैसे ते 100 रुपये प्रति लिटर असा प्रवास वर्णन केलाय. कंचन दाऊ यांनी सांगितलं की, '1965 मध्ये मी लहान असताना इंधनाची किंमत 90 पैसे प्रति लीटर असायची, त्या वेळी फुटपाथवर इंधनाचे डिस्पेंसर ठेवले जात होते आणि इंधनाची टाकी अंगणात ठेवली जात होती.'
कंचन दाऊ पुढं सांगतात, 1980 पर्यंत जेव्हा-जेव्हा पेट्रोलच्या किमतीत वाढ व्हायची, तेव्हा त्याचा लोकांवर खूप खोल परिणाम व्हायचा. लोकांनी आपली वाहनं रस्त्यावर नेणं बंद केलं किंवा काही मोजकेच लोक आपली वाहनं बाहेर काढायचे. अशा परिस्थितीत आम्हाला खूप वाईट वाटायचं. पेट्रोलचे दर वाढले, तर लोक गाडी चालवणार नाहीत ना, याची काळजी आम्हाला वाटायची, असंही कंचन दाऊ यांनी सांगितलं.
लोक आता वैयक्तिक वाहनं चालवणार नाहीत, पायी जाऊ की बसनं प्रवास करू, अशा गोष्टी बोलू लागले. लोकांच्या अशा गोष्टी ऐकून आम्हाला खूप टेन्शन यायचं. पण वेळ निघून गेली आणि लोकांना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची सवय होऊ लागली. त्यानंतर वाढलेल्या किमतीतही लोक पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू लागले. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) दरात दरवर्षी चढ-उतार होत असतात. पण, सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.