युद्धाने एकाचा विजय अन एकाचा पराजय होतो. पण, याहीपेक्षा वाईट त्या दोन्ही देशाचे नुकसानच जास्त होते. गेल्या दोन वर्षात रशिया आणि युक्रेनच्या जनतेचे हाल आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. सध्या युद्धजन्य स्थिती फार कमी असली तरीही इतिहासात भारताला अनेक गंभीर युद्धांना सामोरे जावे लागले आहे.
1971 अशाच एका लादल्या गेलेल्या युद्धाला भारतीयांना सामोरे जावे लागले होते. ते म्हणजे 3 डिसेंबर 1971 मध्ये झालेले भारत पाकिस्तानचे युद्ध होय. आज या युद्धाला 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीयांच्या शौर्याचे आणि परीक्रमाचे स्मरण करण्यासाठी लष्करी इतिहासात शिकवला जाणारा हा विजय आज आहे. अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावणाऱ्या वीर जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
या युद्धाच्या निकालामुळे दक्षिण आशियाचा नकाशा कायमचा बदलून गेला. आणि जागतिक नकाशावर बांगलादेश नावाच्या राष्ट्राचा उदय झाला. या युद्धाचा परिणाम म्हणून पाकिस्तानचे दोन भाग झाले. या युद्धात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भारताचे तत्कालीन फिल्ड मार्शल सॅम मॅनकेशो यांचे शौर्य जगाने पाहिले. याशिवाय असंख्य भारतीय सैनिकांनी रणांगणात अभूतपूर्व शौर्याचे दर्शन घडविले. या युद्धाच्या असंख्य गोष्टी तूम्ही आजवर वाचल्या असतील. मात्र, एक गोष्ट तूमच्याही हृदयाचा थरकाप उडवणारी आहे.
मेजर इयान कार्डोजो यांची थरकाप उडवणारी कहाणी
असाच एक मेजर जनरल इयान कार्डोजो यांची ही गोष्ट. इयान कार्डोजो हे पाचव्या गोरखा रायफल्सचे मेजर जनरल होते. 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान मेजर कार्डोजो यांना स्वत:चा पाय कापावा लागला होता. या वाईट प्रसंगाबद्दल मेजर सांगतात की, 1971 च्या युद्धात. लढाई त्यावेळी पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात सुरू होती. भारतीय सैन्य पाकिस्तान सीमेच्या आत होते. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैनिकांना पराभूत करण्याच्या जवळ आले होते.
मेजर कार्डोजो यांचे गोरखा रायफल्स सिल्हेटमध्ये युद्ध लढत होते. तर कार्डोजो हे डिफेन्स सर्व्हिस कॉलेज वेलिंग्टन येथे प्रशिक्षण घेत होते. युद्धकाळात या बटालियनचा दुसरा कमांडिंग ऑफिसर शहीद झाला. यानंतर त्यांच्या जागी मेजर कार्डोजो यांना पाठवण्यात आले.
लढाई सुरू होती. एका ऑपरेशनदरम्यान मेजर कार्डोझो यांचा पाय भूसुरुंगावर पडला आणि मोठा स्फोट झाला. काही क्षण त्याचे मन सुन्न झाले. ते भानावर आले आणि त्यांनी पाहिले की, त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मेजर या घटनेबद्दल सांगतात की, "एका स्थानिक रहिवाशाने मला पाहिले. आणि मला उचलून पाकिस्तानच्या बटालियन मुख्यालयात नेले. तिथे मी डॉक्टरांना मॉरफीन द्यायला सांगितलं, पण बहुधा त्याला मॉरफीनही नव्हती."
ते पुढे म्हणाले की, गोरखा रायफल्समध्ये असताना त्यांच्याकडे कुकरी असायची. कुकरी म्हणजे साधारण एक फूट लांब असलेला धारदार खंजीर. मेजर कार्डोजो यांनी त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या आणखी एका गुरखा सैनिकाला त्याचा पाय कापण्यास सांगितले. परंतु त्याने नकार दिला. मी हे करू शकत नाही, असे तो भावनेच्या भरात बोलत होता.
माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता त्यामूळे मी स्वतःच पाय कापण्याचा निर्णय घेतला. मी त्या खंजीराने पाय कापला. यानंतर पाकिस्तानी डॉक्टर मेजर मोहम्मद बशीर यांनी माझ्यावर शस्त्रक्रिया केली. मला रक्ताची गरज असताना विचित्र परिस्थिती निर्माण झाली. काहीही झाले तरी मी पाकिस्तानी रक्त घेणार नाही, असा ठाम निर्धार मी केला. डॉक्टरांनी कसे बसे माझ्यावर शस्त्रक्रिया केली.
त्या कापलेल्या पायाबद्दल ते आजही गमतीने सांगतात की, सध्याच्या बांगलादेशात आजही माझा पाय आहे. मी तो तिथेच पुरला आहे. मेजर कार्डोजो पहिले अधिकारी बनले ज्यांना एक पाय नव्हता. तरीही त्यांनी ब्रिगेडचे नेतृत्व केले. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल तापीश्वर नारायण रैना यांनी त्यांना ब्रिगेडचे नेतृत्व करण्याची परवानगी दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.