Emergency Indira Gandhi, Balasaheb Thackeray, JRD Tata Esakal
देश

Emergency: बाळासाहेब ठाकरे ते विनोबा भावे... कोणी कोणी दिला होता आणीबाणीला पाठिंबा

आशुतोष मसगौंडे

5 जून 1975 ही तारीख भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जो कोणालाही विसरणे शक्य नाही. याला आता 49 वर्षे झाली असली तरी त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.

मंगळवारी आणीबाणीचा ४९ वा वर्धापन दिन आहे. 21 मार्च 1977 पर्यंतचा 21 महिन्यांचा आणीबाणीचा काळ हा देशासाठी एक भयानक स्वप्न होते.

याच्याविरोधात देशातील अनेक दिग्गज नेते रस्त्यावर उतरले होते. तर असेही काही नेते, उद्योगपती होते ज्यांनी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्याचा घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले होते.

बाळासाहेब ठाकरे

दिग्गज नेते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे काँग्रेसच्या कट्टर विरोधकांपैकी एक महत्त्वाते नेते होते. पण त्यांनी 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणीच्या निर्णयाचे उघडपणे समर्थन करत अनेकांना आश्चर्यचा धक्का दिला होता.

आणीबाणीसाठी समर्थन दिल्यामुळे 1978 च्या महाराष्ट्र विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा मोठा पराभव झाला. त्यामुळे पक्षाचे इतके नुकसान झाले की, मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा देऊ केला. त्याविरोधात पक्षात गदारोळ झाल्याने त्यांनी राजीनामा मागे घेतला.

असे असले तरी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेने कधीही दिलगिरी व्यक्त केलेली नाही.

विनोबा भावे

इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये बाळासाहेब ठाकरेंनंतर विनोबा भावे हे एक खूप मोठे नाव होते. भावे हे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध गांधीवादी होते. अनेकजन त्यांना महात्मा गांधींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणायचे.

गांधीवादी असूनही त्यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विनोबा भावे यांनी आणीबाणीच्या घोषणेला अनुशासन पर्व किंवा शिस्तीचा उत्सव म्हटले होते. आणीबाणीच्या त्यांच्या समर्थनामुळे समीक्षकांनी त्यांचे नाव "सरकारी संत" असे ठेवले होते.

जेआरडी टाटा

इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये उद्योगपती जेआरडी टाटा, हे आणखी एक मोठे नाव होते. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत टाटा यांनी आणीबाणी लागू केल्याबद्दल इंदिरा गांधींना दिलेल्या पाठिंब्याचे समर्थन केले होते. ते म्हणाले की "गोष्टी खूप पुढे गेल्या होत्या. संप, बहिष्कार, निदर्शने यातून आम्ही काय भोगत आहोत याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. असे दिवस होते की मी माझ्या कार्यालयातून रस्त्यावर फिरू शकत नव्हतो."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT