कोची : मुसळधार पावसात एक कार नदीच्या पात्रात कोसळल्यानं झालेल्या अपघातात दोन डॉक्टरांना जीव गमवावा लागल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. विशेष बाब म्हणजे या अपघाताचं कारण ठरलंय गुगल मॅप! (2 Kerala doctors die as car falls into river were using Google map amid heavy rain)
माध्यमातील वृत्तानुसार, अद्वैत (वय २९) आणि अजमल (वय २९) हे दोघे डॉक्टर कोची जिल्ह्यातील एका खासगी रुग्णआलयात कार्यरत होते. त्यांच्या कारला रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता अपघात झाला. कोडुंगल्लूर इथून परतीच्या प्रवासादरम्यान पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरुन त्यांची कार जात असताना जवळून वाहणाऱ्या पेरियार नदीत ती वाहून गेली. विशेष म्हणजे ते गुगल मॅप लावून कार चालवत होते. कार नदीत वाहून जात असताना यातून प्रवास करणाऱ्या पाच लोकांपैकी तीघे जण कारमधून बाहेर पडत आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले, यात ते जखमीही झाले. पण या दोन डॉक्टरांना यातून बाहेर पडता आलं नाही.
या दुर्घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची खबर दिली. यानंतर प्रशासनानं बुडालेल्या दोघांना शोधण्यासाठी स्कुबा डायव्हिंगच्या टीमला पाचारण केलं. त्यानंतर या दोघांचे मृतदेह त्यांनी बाहेर काढले. तसेच ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत ज्या तिघांना वाचवलं त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, कार ड्रायव्हिंगवेळी मुसळधार पाऊस सुरु होता तसेच ते गुगल मॅप दाखवत असलेल्या रस्त्यानं निघाले होते. एका वळणावर गुगल मॅपनं त्यांना डावीकडं वळण्यास सुचवलं त्यानुसार त्यांनी आपली कार वळवली. त्यानंतर चुकुन ते आणखी पुढे गेले आणि त्यांची कार थेट नदीच्या पात्रात कोसळली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी पीटीआयशी बोलताना दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.