नवी दिल्ली - नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर एशिया (इंडिया) लिमिटेडला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. AirAsia ने वैमानिकांच्या प्रशिक्षणात चूक केली आणि वैमानिकांच्या रेटिंग तपासणीसाठी आवश्यक सराव केला नसल्याचा DGCA ने ठपका ठेवला आहे. (Air Asia news in Marathi)
DGCA ने जारी केलेल्या निवेदनानुसार कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअरलाइनच्या प्रशिक्षण प्रमुखाला तीन महिन्यांसाठी त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. याशिवाय नामांकित आठ परीक्षकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) संबंधित व्यवस्थापक, प्रशिक्षण प्रमुख आणि AirAsia च्या सर्व नियुक्त परीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवाय तुमच्यावर कारवाई का करू नये, असं उत्तरही मागवलं. यापूर्वी या लोकांचे लेखी जबाब तपासून त्याआधारे कारवाई करण्यात आली.
याआधी जानेवारी 2023 मध्ये, DGCA ने विमानातील महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी एअर इंडियावर मोठी कारवाई केली होती. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच, DGCA ने पायलट-इन-कमांडचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.