2008 ahmedabad serial bomb blast case special court pronounced death sentence to 38 convicts Team eSakal
देश

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा

२४ जुलै २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट ५६ जणांचा मृत्यू झाला होता.

सुधीर काकडे

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २४ जुलै २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट ५६ जणांचा मृत्यू झाला होता. हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जातोय. अहमदाबादमधील २००८ च्या साखळी बॉम्बस्फोटांचा खटल्याचा निकाल जलदरित्या लावण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने ४९ पैकी ३८ दोषींना UAPA आणि IPC ३०२ च्या अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तर इतर ११ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (2008 ahmedabad serial bomb blast case special court pronounced death sentence to 38 convicts)

२००८मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर २००९ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आयपीसी, यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या प्रत्येक कलमांतर्गत प्रत्येक 49 दोषींना सुनावण्यात आलेली शिक्षा एकाच वेळी चालेल. शिवाय, न्यायालयाने ४८ दोषींना प्रत्येकी २.८५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत त्याच्या अतिरिक्त शिक्षेसह, २.८८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

८ फेब्रुवारी रोजी, विशेष न्यायाधीशांनी एकूण ७८ आरोपींपैकी ४९ आरोपींना भारतीय दंड संहितेच्या विविध गुन्ह्यांमध्ये, खून, देशद्रोह आणि राज्याविरुद्ध युद्ध पुकारणे, तसेच बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) या गुन्ह्याखाली दोषी घोषित केले होते.

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद एक तासात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले होते. २० ठिकाणीं २१ बॉम्बचा स्फोट झाला होता. यात एकूण ५६ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता तर २४० लोक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात सर्व दहशतवाद्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

अहमादबादमध्ये २० तर सूरतमध्ये १५ ठिकाणी याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्फोटानंतर ३० दहशतवाद्यांना तेव्हा अटक करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे दुसऱ्याच दिवशी २७ जुलै रोजी अहमदाबाद दौऱ्यावर पोहोचले होते. तर पुढच्या १९ दिवास ३० दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली होती.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी पाचशेहून अधिक आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर सुनावणीदरम्यान ७ पेक्षा जास्त न्यायाधीश बदलले. गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचं म्हटलं जातं. तसंच या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीनने घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT