भारतीयांसाठी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान एकूण २१६ कोटी डोस उपलब्ध होतील. आणि ही लस सर्वांना मिळेल यात शंका नाही.
नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या लसीच्या (Corona Vaccine) तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण (Vaccination) करता येईल, एवढ्या लसी उपलब्ध होतील, अशी माहिती कोविड टास्क फोर्सचे (Covid-19 Task Force) प्रमुख डॉ. विनोदकुमार पॉल यांनी दिली. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान २१६ कोटी डोस उपलब्ध होतील. तसेच प्रत्येक भारतीयाचे लसीकरण केल्यानंतरही पुरेसे डोस शिल्लक राहतील, असेही पॉल यांनी सांगितले. (216 crore doses to de available by end of 2021 says Central Govt)
गुरुवारी (ता.१३) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पॉल म्हणाले की, 'भारतीयांसाठी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान एकूण २१६ कोटी डोस उपलब्ध होतील. आणि ही लस सर्वांना मिळेल यात शंका नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत, देशातील नागरिकांना १७.७२ कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत.
जानेवारीत भारताने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविशिल्डला लसीकरणासाठी मान्यता दिली. गेल्या महिन्यात रशियाच्या स्पुतनिक-५ ला भारतात आपत्कालीन वापरास परवानगी देण्याची शिफारस केली होती. पॉल म्हणाले की, स्पुतनिक-५ लस भारतात दाखल झाली आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. रशियाकडून लसींचा मर्यादित पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल, अशी आम्हाला आशा आहे.
सरकारचा रोडमॅप तयार
यावेळी, पॉल यांनी लसींच्या रोडमॅपशी संबंधित आकडेवारी देखील सादर केली. फायझर-बायोएनटेक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, मॉडर्ना आणि चीनची सिनोफार्म या लसींची नावे वगळण्यात आली आहेत. एप्रिलमध्ये सरकारने अशा लसींच्या तातडीच्या वापरासाठीच्या शिफारशींना मान्यता दिली होती. अमेरिका, युरोप, जपान आणि ब्रिटनच्या नियामकांनी या लसींच्या वापराला ग्रीन सिग्नल दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लसींचा या यादीत समावेश आहे.
२१३ कोटी लसींचा रोडमॅप
कोविशिल्ड : ७८ कोटी डोस
कोवॅक्सिन : ५५ कोटी डोस
बायो ई सबयुनिट लस : ३० कोटी डोस
झायडस कॅडिला डीएनए : ५ कोटी डोस
नोवावॅक्स : २० कोटी डोस
भारत बायोटेक इंट्रानेजल : १० कोटी डोस
जिनिव्हा mRNA : ६ कोटी डोस
स्पुतनिक-५ : १५.६ कोटी डोस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.