Water Crisis 
देश

Water Crisis: प्यायला पुरेसं पाणी नसताना लोक धुवत होते गाड्या; २२ नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल

भीषण पाणी संकटात पिण्याच्या पाण्याचा केला गैरवापर केल्यानं नागरिकांना महापालिकेनं चांगलाच दणका दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरु : कर्नाटकाची राजधानी बंगळुरु इथं सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. तरी सुद्धा नागरिकांमध्ये सुज्ञपणा दिसून येत नाही. पिण्याचं पाणी मिळणं मुश्किल झालेलं असताना काही नागरिक या पाण्याचा गैरवापर करत असल्याचं समोर आल्यानं शहरातील २२ नागरिकांना मिळून लाखोंचा दंड स्थानिक प्रशासनानं ठोठावला आहे. देशात पहिल्यांदाच असं काहीतरी घडल्याचं सांगितलं जात असून त्यामुळं हा विषय चर्चेत आला आहे. (22 Bengaluru residents imposed Rs 1 lakh fine for misusing potable water amid crisis)

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बंगळुरु वॉटर सप्लाय आणि सिवेज बोर्डनं (BWSSB) वाहनं धुण्यासाठी, बागांना दररोज पाणी देणं, इमारतींचं बांधकाम, बागांमधील किंवा सोसायट्यांमधील पाण्याची कारंजी, वॉटर पार्क, सिनेमा हॉल आणि मॉल्स, रस्त्यांची बांधकामं आणि स्वच्छता मोहिम यासाठी पाण्याचा वापर करण्यास बंदी घातली आहे. (Latest Marathi News)

गेल्या शुक्रवारी BWSSB नं पाण्याच्या वापरावर निर्बंध आणले होते. जर पाण्याचा गैरवापर करताना कोणी आढळलं तर त्याला जागेवरच दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अनेक नागरिकांनी या नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये २२ नागरिकांनी या नियमाचं उल्लंघन केलं असून यामध्ये बहुतकरुन शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांनी या नियमाचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये ६५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

शहरातील दीड कोटी लोकसंख्येसाठी बोर्डानं आदेश काढला की, शहरातील तापमान वाढायला लागलं आहे. यंदा पाऊसही कमी प्रमाणात झाल्यानं त्याचबरोबर जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत, त्यामुळं पाण्याचा जपून वापर करावा, जर कोणी पाण्याचा गैरवापर करताना आढळला तर त्याला जागेवरच दंड ठोठावण्यात येईल, असं या आदेशात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT