बेंगळुरू : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात फुटपाथवर चालणाऱ्या एका २३ वर्षीय महिलेचा आणि तिच्या ९ महन्याच्या बाळाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. शहरातील होप फार्मजवळील फूटपाथवर पडलेल्या विजेच्या तारांना चुकून स्पर्श झाल्याने या दोघींना जीव गमवावा लागला. रविवारी पहाटे ही घटना घडली. तामिळनाडूहून आलेली सौंदर्या ही महिला मुलगी सुविक्षासोबत पायी घरी जात असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी आई आणि मुलीचे सामान रस्त्यावर विखुरलेले होतेय कडुगोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रुग्णालयात दाखल केले. बेंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीच्या (बेसकॉम) अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंगळुरूमधील कडुगोडी पोलिस स्टेशन अंतर्गत होप फार्मजवळ काल सकाळी 6 वाजता एक महिला (वय 23 वर्षे) आणि तिची मुलगी (9 महिने) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित BESCOM अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी केली जात आहे अशी माहिती डीसीपी व्हाइटफिल्ड, बेंगळुरू यांनी दिली.
तिघे निलंबीत
आम्ही या मृत्यूंना कारणीभूत असलेल्या घटनेची चौकशी सुरू आहे आणि आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत. लाइन मॅन, AE आणि AEE यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. या दुर्घटनेसाठी इतर कोणीही जबाबदार असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. या घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी 5 लाख रुपये देईल अशी माहिती केजे जॉर्ज, कर्नाटकचे ऊर्जा मंत्री यांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.