छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित बिजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी ७०० हून अधिक जवानांना घेरुन हल्ला केला. यावेळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, सीआरपीएफवर या मोहिमेत अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी खोडून काढला असून "असं असतं तर इतके नक्षलवादी मारले गेले नसते" असं म्हटलं आहे.
CRPF चे डीजी कुलदीप सिंह म्हणाले, "जर यामध्ये आपलं कुठल्याही प्रकारे अपयश असतं तर इतके नक्षलवादी मारले गेले नसते. जखमी नक्षलवादी आणि मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी आपल्याला तीन ट्रकची गरज पडली. मात्र, या मोहिमेत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची नेमकी संख्या सांगणं कठीण आहे. पण ती २५ ते ३० असण्याची शक्यता आहे."
बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी माहिती देताना सांगितलं की, बेपत्ता जवानांचा शोध घेताना आज केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये २० जवानांचे मृतदेह आढळून आले. या घटनेत एकूण २२ जवानांनी आपला जीव गमावला. यांपैकी दोन जवान अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये आपले ३१ जवान जखमी झाले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. शाह यांनी बघेल यांना या घटनेची फोनवरुन माहिती दिली. दरम्यान, बघेल हे आसाममध्ये प्रचार दौऱ्यावर होते. संध्याकाळी राज्यात परतल्यानंतर त्यांनी सांगितलं की, २,००० सुरक्षा रक्षकांना नक्षल्यांच्या ठिकाणं ताब्यात घेण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. यामुळे नक्षलवाद्यांना रोखण्यात यश येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.