Chennai company gifts 28 cars including Mercedes Benz to employees 
देश

कंपनी असावी तर अशी! दिवाळीचं गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना वाटल्या बाईक अन् मर्सिडीज, टाटा-मारुतीच्या गाड्या

रोहित कणसे

दिवाळीचा सण सध्या अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमीत्ताने मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अनेकदा छोटी-मोठी भेटवस्तू देत असतात. पण चेन्नई येथील एका कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेलं गिफ्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. या कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क २८ कार आणि २९ बाईक गिफ्ट केल्या आहेत. या गाड्यांच्या मॉडेल्समध्ये हुंदाई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

असं महागडं गिफ्ट देणाऱ्या चेन्नईच्या या कंपनीचे नाव 'टीम डिटेलिंग सोल्युशन्स' असे आहे. ही कंपनी स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि डिटेलिंग सर्व्हिस संबंधित काम करते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची मेहनत आणि समर्पण पाहाता कंपनीने इतक्या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. या कंपनीत सुमारे १८० कर्मचारी आहेत.

तर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीधर कन्नन यांनी सांगितले की, आम्ही कमपनीच्या यशात त्यांचे( कर्मचाऱ्यांचे) अथक प्रयत्नांसाठी त्यांचे कौतुक करू इच्छीतो. आम्ही समजतो की आमचे कर्मचारी आमची सर्वात मोठी संपत्ती आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे त्यांची कामगिरी आणि ते किती वर्षांपासून काम करत आहेत याच्या आधारावर मुल्यमापन केले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत समर्पण भावनेने काम केले आहे. आम्हाला त्यांच्या यशावर गर्व आहे.

कन्नन यांनी सांगितले खी, ते अशा कर्मचाऱ्यांची निवड करतात की जे गिफ्ट मिळल्याने खूप प्रेरित होतात. या कर्मचाऱ्यासाठी कार किंवा बाईक खरेदी करणे एक स्वप्न असते. त्यांनी सांगितले की यापूर्वीदेखील ते कर्मचाऱ्यांना बाईक्स गिफ्ट करत आले आहेत. २०२२ मध्ये त्यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली होती.

इतकेच नाही तर ही कंपनी कर्मचाऱ्यांना लग्नासाठी पैसे देखील देत आहे. कन्नन यांनी सांगितले की, कंपनीचा एखादा कर्मचारी लग्न करत असेल तर त्याला मदत म्हणून एक लाख रुपये दिले जात आहेत. आधी ही रक्कम ५० हजार रुपये इतकी होती. ती रक्कम आता वाढवून एक लाख रुपये करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

Pune Crime : सिंहगड रस्ता परिसरात बांबू आणि दगडाने बेदम मारहाण करून तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT