army helicopter crash 
देश

Plane Crash : एकाच दिवशी भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात

सकाळ डिजिटल टीम

3 Aircraft Crashed in MP, Rajasthan : राजस्थानमध्ये एका विमानाचा तर मध्यप्रदेशात हवाईदलाच्या २ विमानाचा अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे लष्कराचे विमान कोसळले. विमान क्रॅश होऊन आग लागली. माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.

तसेच मध्य प्रदेशातील मुरैना येथे आज (शनिवार) सकाळी मोठा अपघात झाला. ज्यात हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० क्रॅश झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत. या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते, जेथे सराव सुरू होता. पहाटे साडेपाच वाजता हे विमान कोसळले. दरम्यान दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

राजस्थानमध्ये देखील अपघात-

यूपीमधील आग्रा येथून उड्डाण करणारे विमान राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उछैन परिसरात कोसळले. चांगली गोष्ट म्हणाले हे विमान रहिवासी भागात कोसळली नाही. हे विमान भरतपूरमध्ये कोसळले. दरम्यान पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vidhansabha Election : पुण्यात पुन्हा धंगेकर विरूद्ध रासने! विधानसभेला भाजपकडून जुन्याच चेहऱ्यांना संधी

IND vs NZ Test: ४३३१ दिवस, १२ वर्षे अन् १८ मालिका... अखेर टीम इंडिया मायदेशात हरले! एकदा आकडेवारी पाहाच

Murlidhar Mohol on Manoj Jarange : जरांगे पाटलांचा राग फडणवीसांवर नाही तर... मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले

राज ठाकरेंसोबत माझी तुलना कधी होऊ शकत नाही कारण... अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या वडिलांविषयी भावना

Vasai Assembly Election 2024 : वसईत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ...

SCROLL FOR NEXT