तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात औक्षण करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी धाराशिवमध्ये मटणाची पार्टी केली. पण दुसरीकडं त्यांच्याच पार्टीत मोठा बदल झाला. (35 BRS leaders join Congress in presence of Mallikarjun Kharge, Rahul Gandhi )
माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह 35 नेत्यांनी सोमवारी (26 जून) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षाशी हातमिळवणी केली.(Latest Marathi News)
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगण प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनीही एआयसीसी कार्यालयात तेलंगणा काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.(Latest Marathi News)
या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
पीएस रेड्डी आणि कृष्णा राव यांच्या व्यतिरिक्त माजी आमदार गुरुनाथ रेड्डी, माजी आमदार आणि सेवारत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोराम कनकैय्या, माजी आमदार पायम व्यंकटेश्वरलू, माजी डीसीसीबी अध्यक्ष मुवमेंट विजया बेबी, एससी कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष पिदामार्थी रवी, विद्यमान डीसीसीबी अध्यक्ष थुल्लुरी ब्राम्हय्या, मार्कफेडचे विद्यमान अध्यक्ष डॉ. वरिया येथील प्रदेश उपाध्यक्ष बोरा राजशेखर, विद्यमान नगराध्यक्ष एस. जयपाल यांच्यासह अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.(Latest Marathi News)
तर केसीआर यांची मटणाची पार्टी
धाराशिवमध्ये मटणावर ताव मारुन 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर सोलापूरकडे रवाना झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मंत्रिमंडळासह आज संध्याकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत. दरम्यान केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत आखल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीदेखील ट्विट करुन टिका केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.